मराठी बातम्या /बातम्या /देश /

ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं संसद भवन होणार इतिहासजमा; अशी असेल नवी इमारत

ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं संसद भवन होणार इतिहासजमा; अशी असेल नवी इमारत

देशाच्या नवीन संसद भवनाचे (Parliment) प्रारंभिक चित्र समोर आले आहे. या नवीन इमारतीची शैली त्रिभुजाकार असेल.

देशाच्या नवीन संसद भवनाचे (Parliment) प्रारंभिक चित्र समोर आले आहे. या नवीन इमारतीची शैली त्रिभुजाकार असेल.

देशाच्या नवीन संसद भवनाचे (Parliment) प्रारंभिक चित्र समोर आले आहे. या नवीन इमारतीची शैली त्रिभुजाकार असेल.

नवी मुंबई, 07 नोव्हेंबर: देशाच्या नवीन संसद भवनाचे प्रारंभिक चित्र समोर आले आहे. या नवीन इमारतीची शैली त्रिभुजाकार असेल. टाटा प्रोजेक्ट लिमिटेड बांधत असलेल्या या संसद भवनची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. इमारत त्रिकोणी असल्याने त्यामागील वास्तूशास्र असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या संस्कृतीत त्रिकोणाला खूप महत्त्व आहे. आपल्या वैदिक संस्कृतीतही त्रिभुजाचा उल्लेख आहे, ज्यास त्रिकोण म्हणतात. हा आकार ध्यानादरम्यान मन एकाग्र राहण्यास मदत करतो. अनेक प्रकारच्या तांत्रिक विधींमध्ये त्रिकोणी आकृतीला खूप महत्त्व असते आणि असे मानले जाते की केवळ या आकारानेच अनुष्ठान पूर्ण केले जाऊ शकते. त्याऐवजी मंडल तयार करणं किंवा इतर कोणताही आकार वापरणं कार्यसिद्धीसाठी उपयोगी नसतं. तीन दिशांना तीन-कोन असलेला त्रिभुज वेगवेगळ्या मार्गांनी वेगळे प्रभाव दर्शवितो. जर त्रिकोण वरच्या दिशेने असेल तर याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये अग्नि, लिंग आणि पुरुष या तत्त्वांचा प्रभाव अधिक आहे त्यामुळे त्याच्याशी संबंधित संबंधित धार्मिक अनुष्ठानंच केली जाऊ शकतात. त्याच प्रकारे, जर त्रिकोण खालच्या दिशेने दर्शविला गेला तर तो पाणी, योनी आणि निसर्ग या तत्त्वांचं प्राबल्य दर्शवेल. अशा त्रिकोणांनी ग्रहांशी संबंधित परिस्थिती सुधारू शकते. कधीकधी दोन त्रिकोण देखील एकत्र काढले जातात. या आकृत्या भेदक किंवा एकमेकांना ओव्हरलॅप करतात. यामध्ये, त्रिकोणाचं एक टोक वर असतं, तर दुसरं टोक खाली असतं. ही आकृती पुरुष आणि निसर्ग ही तत्त्वं एकत्रित दर्शवते, वरचा कोन पुरुष आहे, तर खालचा कोन निसर्गाचं लक्षण मानलं जातं. जेव्हा दोन त्रिकोण अशा प्रकारे एकत्र होतात की दोन्ही एकत्र एक ताऱ्याचा आकार बनतो, म्हणजेच सहा कोन दिसतात, तर ते एक रचनात्मक वर्धक आकार बनतात. अशा कोनातून केलेले विधी कोणत्याही रचनात्मक कामात यश देतात असं मानलं जातं. जेव्हा त्रिकोणी आकृती एकमेकांपासून वेगळ्या दिसतात, म्हणजेच त्यांचा परस्परांशी संबंध नसतो, तेव्हा ते काहीतरी वेगळंच सांगत असतात. हे सांगतात की वेळ संपत आला आहे आणि आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वैदिक ज्योतिषामध्ये, ज्याला सर्वत्र मान्यता प्राप्त आहे, त्रिकोणदेखील महत्त्वपूर्ण आहे. पहिले, पाचवे आणि नववे घर त्रिकोणी पद्धतीने जोडलेली आहेत आणि सर्व वेगळे परिमाण देतात. म्हणजेच जुन्या परिसरात नवीन संसद भवनचं बांधकाम वैदिक पद्धतीने केले जाईल जेणेकरुन ही इमारतदेखील देशाच्या प्रगतीत उपयुक्त ठरेल. अंदाजे 861.90 कोटी खर्च करून नवीन संसद इमारत एका वर्षात पूर्ण होईल, असा अंदाज आहे. नवीन इमारतीत संयुक्त अधिवेशन सुरू असलं तरी 1,350 खासदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा असेल. खासदारांच्या बसण्याची व्यवस्था अधिक सोयीस्कर केली जात आहे. त्याअंतर्गत, टू-सीटर बेंच असतील, जेणेकरुन कोणत्याही खासदाराला आरामात बसण्याची सोय होईल. सध्या जागा भरल्या गेल्यानंतर खासदारांना अगदी अडचणीत बसावं लागतं. नवीन इमारत ही समस्या दूर करेल. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (CPWD) मते, ही इमारत 65 हजार चौरस मीटर क्षेत्रामध्ये पसरली असेल, ज्याचे क्षेत्रफळ 16921 चौरस मीटर असेल. अशा प्रकारे, इमारतीत तळ मजला आणि भूमिगत माजल्यासोबत आणखी दोन मजले असतील. नवीन इमारतीत बरेच मनोरंजक प्रयोग केले जाऊ शकतात. इथल्या सेंट्रल हॉलमध्ये विविध आकार आणि पद्धतींच्या खिडक्या असतील. या खिडक्या प्रत्यक्षात देशातील विविधता दर्शवतील. खरंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम का आवश्यक आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. वर्ष 2026 मध्ये, देश लोकसभेतील सदस्य संख्येबाबत निर्णय घेऊ शकेल. संपूर्ण लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खासदारांची संख्याही वाढवली जाऊ शकते. या संदर्भात राजकीय तज्ज्ञांचे मत आहे की वर्ष 2026 मध्ये देशातील लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 848 सदस्यांची गरज भासू शकेल. वर्ष 2019 मध्येच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांची सध्याची संख्या 545 वरून जवळपास दुप्पट करण्याची गरज व्यक्त केली होती. पुढील पाच वर्षानंतर यावर चर्चा होईल. परंतु, ही शक्यता लक्षात घेऊन संसदेच्या नव्या इमारतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
First published:

Tags: Parliament

पुढील बातम्या