भुसावळ, 4 डिसेंबर: भरधाव डंपरनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघात (Major Accident) एका दाम्पत्याचा जागेवरच मृत्यू झाला. भुसावळ (Bhusawal) शहरातील खडका चौफुलीवरवर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. मृत दाम्पत्य बुलढाणा (Buldana) येथील असल्याची माहिती मिळाली आहे. ते भुसावळला लग्नासाठी आले असता त्यांच्यावर काळानं घाला घातला.
हेही वाचा...महाराष्ट्र बदलत आहे! महाविकास आघाडीला जनतेनं स्वीकारलं, शरद पवारांची प्रतिक्रिया
मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील खडका चौफुलीवर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला चिरडलं. या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झालं. हा अपघात शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास झाला. चंद्रकांत वराडे (वय-62) आणि संध्या वराडे (वय-58) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत.
वराडे दाम्पत्य हे बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील रहिवासी होतं. ते काल (गुरुवारी) आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी भुसावळात आले होते. त्यांच्या नातेवाईकाचे आज (शुक्रवारी) लग्न होतं. लग्नासाठी भुसावळ शहरातील विवाहस्थळी ते आपल्या दुचाकीनं (एमएच 28, एसी 6671) जात होते. त्याचवेळी खडका चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या डंपरनं (एमएच 19 झेड 3192) जोरदार धडक दिली. त्यात वराडे दाम्पत्य थेट डंपरच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दुसरीकडे, पुण्यातील अशाच एका भीषण अपघातचा व्हिडिओ समोर आला आहे. टिळक रस्त्यावर हा अपघात झाला होता. या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. वेगाने फरफटत येत असलेला दुचाकीस्वार बसच्या समोरच्या भागाखाली जात असल्याचं या दृश्यांमध्ये दिसत आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या अपघाताने खळबळ उडाली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे.
वेगाने फरफटत येत असलेला दुचाकीस्वार समोरूव येणाऱ्या बसखाली आला. पुण्यातल्या भीषण अपघाताचा CCTV VIDEO अंगावर शहारे आणेल; टिळक रस्त्यावर दुचाकीस्वार बसखाली pic.twitter.com/73wqOBG39v
— News18Lokmat (@News18lokmat) February 3, 2020
हेही वाचा...शीतल आमटेंच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांसमोर उभं राहिलं मोठं आव्हान
दुचाकीस्वार वेगाने समोरून फरफटत येताना पाहून वेगवान बस थांबली, पण तोवर दुचाकी बसच्या मधल्या भागात अडकल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. रविवारी दुपारी हा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.