मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आधी विष प्राशन केलं मग...; सांगलीत प्रेमीयुगुलानं LOVE स्टोरीचा केला भयावह शेवट

आधी विष प्राशन केलं मग...; सांगलीत प्रेमीयुगुलानं LOVE स्टोरीचा केला भयावह शेवट

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Suicide in Sangli: मणेराजुरी येथील एका डोंगरावर एक युवक आणि दोन युवतींनी आत्महत्या केल्यानंतर कुपवाड याठिकाणी आणखी एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या (Couple commits suicide in sangli) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सांगली, 25 डिसेंबर: तीन दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरातील शिकोबा डोंगरावर एक युवक आणि दोन युवतींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. संबंधित तिघांनी द्राक्षांवर फवारणी करण्याचं औषध प्राशन करून आपल्या जीवनाचा भयावह अंत केला होता. यावेळी मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि फुलांचा हार अशा वस्तू आढळल्या होत्या, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही खळबळजनक घटना ताजी असताना, मणेराजुरी शेजारील कुपवाड याठिकाणी एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या (Couple commits suicide in sangli) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

कुपवाड बुधगाव रस्त्यावरील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून गळफास घेत आत्महत्या (drink poison and hung themselves) केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक शेतकरी शनिवारी सकाळी आपल्या शेतात आला होता. यावेळी पत्र्याचं शेड आतून बंद असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी शेडचं दार तोडलं आणि आतलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

हेही वाचा-गरोदर पत्नीसोबत पतीचं राक्षसी कृत्य; दोन जीवांच्या महिलेनं जन्माआधीच गमावलं बाळ

पत्र्याच्या शेडमध्ये दोघांनी आत्महत्या केल्याचं कळताच संबंधित शेतकऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा-बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उकळले 3 लाख; डाव उलटला अन्...

राजू महादेव माळी (वय 36 रा. खोत मळा, कुपवाड) आणि रीना किरण पार्लेकर (वय-33 वखारभाग रामलिंग कॉलनी, मिरज) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रेमीयुगुल हे कुपवाड औद्योगिक वसाहतीतील एका गारमेंट्समध्ये नोकरीस आहेत. संबंधित दोघेजण शुक्रवार रात्री कुपवाड - बुधगाव रस्त्यावरील खोत मळ्यामधील पत्र्याच्या शेडमध्ये एकत्र आले होते. याठिकाणी दोघांनी एकत्र विष प्राशन केलं, त्यानंतर शेडमधील लोखंडी अँगलला एका साडीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Sangli, Suicide