बीड, 25 डिसेंबर: बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका तरुणाकडून 3 लाख रुपयांची खंडणी (extort 3 lakh) वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून एका महिलेसह तिच्या मावस भावाला रंगेहाथ अटक (red handed arrest) केली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोदा तालुक्यातील एक तरुण नांदेड येथील एका कंपनीत कामाला होता. याठिकाणी काम करत असताना च्याची एका महिलेशी ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पण कालांतराने दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि संबंधित तरुणाने लग्नाला नकार दिला. तरुणाने लग्नाला नकार दिल्यानंतर, संबंधित महिला बलात्काराची तक्रार देण्यासाठी नांदेडवरून बीडमध्ये दाखल झाली. यावेळी ती संबंधित तरुणाच्या गावीही गेली.
हेही वाचा-भाकर मागताच संपापली सुन, सासूच्या कानशिलात लगावत हाताची बोटं मोडली, पतीलाही झोडल
याठिकाणी तरुणाच्या घरच्यांनीही लग्नाला विरोध दर्शवला. लग्नाला विरोध केल्याने संबंधित महिलेनं प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून 3 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचं ठरवलं. दरम्यान पीडित तरुणाच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या कानावर घातला.
हेही वाचा-बीड: 50 हजारांच्या अनुदानासाठी जिवंत व्यक्तींना दाखवलं मृत; मोठं रॅकेट सक्रिय?
त्यानंतर पोलीस अपअधीक्षक वाळके यांच्या आदेशानुसार, शुक्रवारी दुपारी पोलीस पथकाने बीड शहर बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. याठिकाणी आरोपींनी पीडित तरुणाकडून तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच दोघांनीही रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Crime news