मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon: बंदुकीच्या धाकाने कापूस व्यापाऱ्याला लुटलं; डोळ्यादेखत लाखो रुपयांवर मारला डल्ला

Jalgaon: बंदुकीच्या धाकाने कापूस व्यापाऱ्याला लुटलं; डोळ्यादेखत लाखो रुपयांवर मारला डल्ला

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात एका कापूस व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने बंदुकीच्या धाकाने 7 लाखांवर डल्ला (7 lakh theft at gunpoint) मारला आहे.

    जळगाव, 24 नोव्हेंबर: जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात एका कापूस व्यापाऱ्याला लुटल्याची (Cotton trader looted by 4 people) धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादी व्यापारी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आपल्या दुचाकीनं पहुरकडे जात होते. दरम्यान त्याठिकाणी दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी फिर्यादीची दुचाकी आडवून त्यांच्याकडी सात लाख रुपयांची रोकड लुटली (Robbed 7 lakh at gunpoint) आहे. ही घटना घडल्यानंतर फिर्यादींनी पहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत चार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा (FIR lodged)दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.  संजय रामकृष्ण पाटील असं फिर्यादी कापूस व्यापाऱ्याचं नाव आहे. हेही वाचा-औरंगाबादेत बनावट ई-मेलद्वारे स्टील कंपनीच्या संचालकाला लुबाडलं; 36 लाखांचा गंडा फिर्यादी रामकृष्ण पाटील बुधवारी सकाळी आपल्या दुचाकीने पहुरकडे चालले होते. सोनाळा येथील तलावाजवळून जात असताना, समोरून दोन दुचाकीवरुन आलेल्या चार भामट्यांनी त्यांना अडवलं. आरोपींनी फिर्यादीला बंदूक आणि चाकुचा धाक दाखवत त्यांच्या गाडीच्या हँडलला अडकवलेली पैशांची बॅग घेऊन पळ काढला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. हेही वाचा-अल्पवयीन बहीण-भावावर तरुण जोडप्याचा बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना यावेळी संजय पाटील यांच्यासोबत गावातील 13 वर्षीय हितेश नाना पाटील हा लहान मुलगा देखील होता. स्वत: सोबतच लहानग्या हितेशला काही ईजा पोहचू नये. म्हणून संजय पाटील यांनी अज्ञात चोरट्यांचा कोणताही प्रतिकार केला नाही. ही घटना घडल्यानंतर पाटील यांनी पहुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर, घटनास्थाळाचा पंचनामा केला आहे. अशाप्रकारे दिवसा-ढवळ्या बंदुकीच्या धाकावर झालेल्या चोरीनं परीसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा पुढील तपास पहूर पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon, Robbery

    पुढील बातम्या