VIDEO : पुणे सीलबंद केल्यानंतर पोलिसांचं आक्रमक रूप, भर चौकात तरुणाला धू-धू धुतला

VIDEO : पुणे सीलबंद केल्यानंतर पोलिसांचं आक्रमक रूप, भर चौकात तरुणाला धू-धू धुतला

रस्त्यावर फिरणाऱ्या एका व्यक्तीची पुणे पोलिसांनी भर चौकात धुलाई केली आहे.

  • Share this:

पुणे, 20 एप्रिल : पुण्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आता पुणे पूर्णपणे सील करण्यात आले आहे. पुणे शहर 27 एप्रिलपर्यंत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढचे आठ दिवस पुण्यात पू्र्ण संचारबंदी लागू असणार आहे.

या संचारबंदीच्या काळात कुणी बाहेर आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले होते. मात्र तरीही अनावश्यपणे रस्त्यावर फिरणाऱ्या एका व्यक्तीची पुणे पोलिसांनी भर चौकात धुलाई केली आहे. सध्या एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये चार ते पाच पोलीस एका व्यक्तीला लाथांसह काठीने मारताना दिसत आहेत.

दरम्यान, आजपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही उद्योग सुरू होत आहे. मात्र, त्याच वेळी पुढचे 8 दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. पुणे आणि पिंपरीतून बाहेर कुणी जाऊ नये आणि जिल्ह्यातून कुणी येऊ नये यासाठी हद्दी,सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील बराच भाग आधीच सील करण्यात आला आहे.

सील केलेल्या भागात 10 ते 12 दोन तास तर उर्वरित भागात 10 ते 2 या वेळात जीवनावश्यक सुविधा पुरवणाऱ्या सेवा सुरू राहणार आहेत. औषधाची दुकाने,रुग्णालय पूर्ण वेळ उघडी राहणार आहेत.

काही भागात 24 एप्रिलपर्यंत दुकानं बंद, होम डिलिव्हरी सुरू

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. सतत गर्दी होत असल्याने किरकोळ दुकानदारांच्या आयुष्याचाच आता प्रश्न निर्माण झाल्यामुळे शहरातील कोथरुड, शास्त्रीनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, दत्तवाडी, दांडेकर पूल, कर्वेनगर, शिवदर्शन या भागातील किरकोळ दुकानदारांनी 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान (मंगळवार ते शुक्रवार) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गरजू लोकांना घरपोच सामान दिले जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 20, 2020, 1:09 PM IST

ताज्या बातम्या