सोलापुरात पोलिसांवर दगडफेक, रथ ओढू न दिल्याने गावकऱ्यांचा हल्ला

सोलापुरात पोलिसांवर दगडफेक, रथ ओढू न दिल्याने गावकऱ्यांचा हल्ला

संचारबंदी असताना सर्व धार्मिक कार्यक्रम राज्यात स्थगित केलेले असतानासुद्धा वागदरीत हा निंदनीय प्रकार घडला आहे.

  • Share this:

सोलापूर, 30 मार्च : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लावण्यात आली आहे. तसंच धार्मिक ठिकाणीही गर्दी करून नये अशी सूचना देण्यात आली आहे. पण तरीही सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यात परमेश्वर देवस्थानची यात्रा भरवण्यात आली. पोलिसांनी हटकले असता गावकऱ्यांनी दगडफेक केली.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील  वागदरी इथं परमेश्वर देवस्थानच्या यात्रेतील रथ ओढण्याच्या कारणावरून तेथील तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. ही घटना रविवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली.

हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी 'या' देशाचा हायटेक प्लॅन, शहरभर लावले 1 लाख CCTV

सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केलेले असतानासुद्धा तरुणांनी रथ ओढण्याचा आग्रह केल्यावर पोलिसांनी तरुणांना रोखन्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांवर दगडफेक झाली.

यामध्ये पोलीस निरीक्षक के एस पुजारी यांच्यासह सहा जण जखमी झाले.

वागदरी या गावात यात्रेत रथ ओढण्याचा कार्यक्रम दरवर्षी होतो. यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक विधी रद्द करण्यात आलेले होते. रविवारी सायंकाळी मंदिरात पूजेचा कार्यक्रम होता. फक्त पूजा करून गावकऱ्यांनी जावे अशी पोलिसांनी विनंती केली होती तशी त्यांना नोटीस सुद्धा यापूर्वी देण्यात आल्याचं समजतं.

हेही वाचा -गावी जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतला, इंडिका कार पुलावर आदळून मायलेकांचा मृत्यू

यावेळेस मोठ्या संख्येने तरुण जमा झाले होते. सर्व धार्मिक विधी रद्द झाले असले तरी काही जमलेल्या तरुणांनी यात्रेतील रथ ओढण्याचा प्रयत्न केला. त्यास पोलिसांनी अटकाव केला असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक के एस पुजारी, तीन पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड असे पाच जण जखमी झाले.

संचारबंदी असताना  सर्व धार्मिक कार्यक्रम राज्यात स्थगित केलेले असतानासुद्धा  वागदरीत हा निंदनीय  प्रकार घडला आहे. रात्री उशिरा दोषींवर गुन्हा नोंदविण्याचे काम उत्तर पोलीस ठाण्यात चालू होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2020 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading