Home /News /maharashtra /

गावी जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतला, इंडिका कार पुलावर आदळून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू

गावी जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतला, इंडिका कार पुलावर आदळून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू

अचानक टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावर जाऊन आदळली

येवला, 30 मार्च : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये अशी वारंवार विनंती आणि सूचना केली जात आहे. परंतु,तरीही लोकं बाहेर पडत आहे. येवल्यात एका कारला झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी आहे. येवल्याजवळ नाशिक-औरंगाबाद मार्गावर ही घटना घडली. कोरोनाच्या भीतीमुळे नाशिककडून येवला मार्गे पैठण तालुक्यातील बिडकीन या आपल्या गावाकडे जाधव कुटुंब  टाटा इंडिका कारमधून 5 जण हे जात होते.. येवला जळगाव नेऊरजवळ कारला अपघात झाला. या  अपघातात गीता जाधव आणि विराज जाधव हे दोघे मायलेक  ठार झाले.   अचानक टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाने या अपघातात आई आणि मुलाचा समावेश आहे. तर या कारमधील  विराट जाधव, मयूर जाधव आणि कार चालकाचा समावेश आहे. जखमींना येवल्याच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाईकवर जाणाऱ्या पती, पत्नी आणि मुलाचा अपघातात मृत्यू तर रविवारी डोंबिवलीतील मोठागाव परिसरातून एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. सर्जेराव पाटील, पत्नी पूनम पाटील आणि 4 वर्षांचा मुलगा अभय पाटील अशी मृतांची नावं आहेत. हेही वाचा - हायस्पीड ट्रेन झाली अ‍ॅम्बुलन्स, 300KM वेगाने रुग्ण पोहचणार रुग्णालयात कोरोनाच्या धास्तीमुळे सर्जेराव पाटील हे पत्नी आणि मुलाला घेऊन बाईकवर साताऱ्याकडे निघाले होते. ते वाईजवळ पोहोचले असता एका भरधाव ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा चारिटेबल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असाताना तिघांचाही मृत्यू झाला. या अकस्मात अपघाताने डोंबिवलीमधील मोठागाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या