Home /News /maharashtra /

देशात दुसऱ्यांदा लागला महाराष्ट्रातील 'या' शहरात 'जनता कर्फ्यू'

देशात दुसऱ्यांदा लागला महाराष्ट्रातील 'या' शहरात 'जनता कर्फ्यू'

संपूर्ण शहरात दिवसभर हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे.

उस्मानाबाद, 31 मार्च : कोरोना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. लोकांनीही यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. पण, त्याच धर्तीवर आता उस्मानाबादमध्ये संचारबंदीचे उल्लंघन होत असल्यामुळे पुन्हा एकदा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. देशभरात 21 दिवसाचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पण तरीही नागरिक सर्रासपणे नियमाचे उल्लंघन करत आहेत. हा बंद यशस्वी करण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात आज जनता कर्फ्यू लागू केला आहे.  पूर्ण दिवसभर हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे. हेही वाचा - पाकमध्ये ATMमधून चोरलं सॅनिटायझर, अजब चोरीचा CCTV VIDEO व्हायरल अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के जनता कर्फ्यू असणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी काढले आहेत. लॉकडाउनचे आदेश देऊनही नागरिक नियम पाळत नसल्याने जनता कर्फ्यूचे आदेश काढले असून नागरिकांनी घराबाहेर पडू नका अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा -लॉकडाऊनमध्येही या कपलने पूर्ण केली 42 किमी मॅरेथॉन, पाहा कसा केला जुगाड दरम्यान, शहरात सकाळपासून जनता कर्फ्यूचे परिणाम चांगले दिसत असून आज नागरिक देखील घराबाहेर पडलेले दिसत नाहीत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या