Home /News /viral /

काय ही हालत! पाकमध्ये ATMमधून चोरलं सॅनिटायझर, अजब चोरीचा CCTV VIDEO व्हायरल

काय ही हालत! पाकमध्ये ATMमधून चोरलं सॅनिटायझर, अजब चोरीचा CCTV VIDEO व्हायरल

आता ATMमधून पैसे नाही सॅनिटायझर चोरलं जातंय. विश्वास बसत नसेल तर हा VIDEO पाहा.

    कराची, 30 मार्च : कोरोनाव्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे लोक स्वत: ला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मास्क घालण्यापासून ते साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ करण्यापर्यंत लोक खबरदारी घेत आहेत. भारताप्रमाणेच पाकिस्तानमधील कोरोनाव्हायरसने आपले पाय पसरले आहेत. मात्र भारतापेक्षा पाकमध्ये परिस्थिती वाईट आहे. सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे लोकांना चक्क चोरी करावी लागत आहे. कोरोनाव्हायरसमुळे, हात सॅनिटायझरची चांगली विक्री होत आहे. मात्र यामुळे सॅनिटायझरची कमतरताही जाणवत आहे. यामुळेच पाकमध्ये एका चोराने चक्क एटीएममध्ये ठेवलेले सॅनिटायझर चोरले. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक व्यक्ती एटीएममधून हँड सॅनिटायझर चोरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, "जेव्हा आपल्याला असे वाटते की कोणीही आपल्याकडे पाहात नाही". पाकमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. वाचा-लॉकडाऊनमुळे ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पाहा VIDEO वाचा-डॉक्टरचं महिलेसोबत अश्लील वर्तन, पाहा रुग्णालयातील धक्कादायक CCTV VIDEO या व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की ती व्यक्ती एटीएममधून प्रथम बाहेर येतो आणि नंतर खाली वाकून सॅनिटायझरने हात साफ करतो. नंतर तेच सॅनिटायझर खिशात टाकतो. या व्हिडिओवर लोकं थट्टा मस्करी करत आहेत. वाचा-कोरोना क्वारंटाइनमध्ये थेट ड्रोन पाठवून मिळवला मुलीचा नंबर, 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला VIDEO 1500हून अधिक लोकांना कोरोनाची लागण पाकिस्तानमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 1500च्या पुढे गेली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक प्रभावित प्रांतांमध्ये पंजाब 593 आणि सिंध 502 घटनांचा समावेश आहे. इमरान खान सरकारने कोट्यवधी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या