नवी दिल्ली, 4 एप्रिल : दिल्लीतील तबलिगी जमातच्या (Tablighi Jamaat) कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग झाल्याच्या शक्यतेमुळे उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलेल्या इंडोनेशियाच्या 8 नागरिकांसह 13 जणांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यांच्या खाण्याची मागणी पूर्ण न केल्याने सदस्यांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. सीएमएस ज्ञानचंद्र यांनी सांगितल्यानुसार, जिल्हा रुग्णालयातील क्वारंटाइन कक्षातील 8 इंडोनेशिअन आणि 5 भारतीय तबलिगी जमातच्या सदस्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केली. यावेळी त्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांकडे अंडा करी आणि बिर्याणीची मागणी केली. त्यांची मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी रुग्णालयातच गोंधळ घातला. यावेळी त्यांचा गोंधळ इतका वाढला की वरिष्ठ पोलिसांना पाचारण करावे लागले. याची माहिती मिळताच डीएम रमाकांत पांडेय, एसपी संजीव त्यागी आणि सीएमओ विजय यादव यांनी रुग्णालयात पोहोचल्यानंतर या नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. संबंधित - पंढरपुरातील चैत्र वारी सोहळा रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय़ यापूर्वी गाजियाबाद येथे झालेल्या अशाच घटनेत आरोपींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्यात आला होता. या नागरिकांवर रुग्णालय परिसरात कपड्यांशिवाय फिरत असल्याचा व नर्सेससोबत छेडछाड आणि अश्लील इशारे केल्याचा आरोप आहे. शिवाय हे सदस्य रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून बीडी-सिगारेटचा मागणी करीत होते. गाजियाबाद येथे घडलेल्या या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘हे कायद्याचं ऐकणार नाही आणि व्यवस्थेचंही ऐकणार नाहीत. हे माणुसकीचे शत्रू आहेत. जे यांनी महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत केलं आहे तो मोठा गुन्हा आहे. त्यांच्यावर एनएसए लागू करण्यात येत आहे. आम्ही यांना सोडणार नाही.’ संबंधित - मुंबईकरांनो सावधान! कोरोनामुळे धारावीतील पहिल्या मृत व्यक्तीचं तबलिगी कनेक्शन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.