Home /News /maharashtra /

कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या वृद्ध पत्नीचा पुढाकार!

कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या वृद्ध पत्नीचा पुढाकार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती आणि संस्थानी आपले योगदान द्यावं असं आवाहन केलं होतं.

    नागपूर, 31 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सढळ हाताने मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करावी असं आवाहन केलं आहे. त्यानंतर कोरोना विषाणूच्या संसर्गापासून लढण्यास मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. नागपुरात एका स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या वृद्ध पत्नीने असाच पुढाकार घेत आपली एका महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला दान केली. हेही वाचा - अजित पवार म्हणाले, 'कोरोना'च्या संकटात संयमाचा 'बारामती पॅटर्न' दाखवूया द्वारकाबाई पांडुरंगजी गावंडे (वय 87) असं या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाच्या पत्नीचं नाव आहे. त्यांचे पती पांडुरंगजी हे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुनीता गावंडे यांच्या त्या सासू आहेत. त्यांनी पेन्शनचा 40 हजार रुपयांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यासाठी सून सुनीता गांवडे यांच्याकडे दिला. सुनीता यांनी हा चेक जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या स्वाधीन केला आहे. हेही वाचा -कोरोनाबाधितांसाठी स्टेडियम वापरण्याचा पर्याय, असा होईल वापर! तुम्ही करू शकता मुख्यमंत्री सहायता निधीत मदत दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा  मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात  दानशूर व्यक्ती आणि संस्थानी आपले योगदान द्यावं असं आवाहन केलं होतं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन दिवसांत 12 कोटी  50 लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.  याशिवाय 20 तारखेपासून आजतागायत  सीएसआर  निधीतून तसेच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक उद्योग आणि संस्थानी मदत देणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी  कोविड -19 व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. सढळ हाताने मदत करा उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात. त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरू करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी,  असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.  खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे  Chief Minister’s Relief Fund-COVID 19 Savings Bank Account number 39239591720 State Bank of India, Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023 Branch Code 00300 IFSC CODE- SBIN0000300 सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या