पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर इंदुरीकर महाराजांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर इंदुरीकर महाराजांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

या पत्राद्वारे इंदुरीकर महाराज यांनी दिवे लावण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे

  • Share this:

संगमनेर, 05 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनानंतर  प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

या पत्राद्वारे इंदुरीकर महाराज यांनी दिवे लावण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. आज रात्री 9 वाजता घरातील दिवे घालवून 9 मिनिटं मेणबत्ती, टॉर्च, दिवे, पणती लावण्याचे आवाहन केलं आहे. दिवे लावणे म्हणजे, एकत्रित होऊन या महामारीचा मुकाबला करणे, असं ते आवाहन आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असं आवाहन इंदुरीकर यांनी केलं आहे.

तसंच,  कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे. घरातून बाहेर पडू नका, प्रवास करणे टाळा आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं.

इंदुरीकर महाराजांनी दिली 1 लाखांची मदत

त्याचबरोबर, कोरोनाच्या संकटात जीवाची बाजी लावून डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी लढा देत आहे. त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा आहे, अशी भावनाही त्यांनी या पत्रकाद्वारे व्यक्त केली.

हेही वाचा  - उस्मानाबादमध्ये कोरोनाचा तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण, राज्यातील आकडा 635 वर

दरम्यान, कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्य सरकारने सढळ हाताने मदत करावं असं आवाहन केलं आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनीही कोरोनाविरोधात लढ्यात खारीचा वाटा उचलला आहे.

प्रबोधनकार इंदोरीकर महाराज देखील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. इंदुरीकर महाराजांनी 1 एप्रिल रोजी 1 लाख रूपयांचा धनादेश संगमनेर तालुक्याचे तहसीलदारांकडे सुपूर्द केला. कोरोना सहायता निधीत त्यांनी आपल्याकडील 1 लाख रूपये देणगी दिली आहेत.

हेही वाचा  - गर्भवती महिला मुस्लिम म्हणून डॉक्टरांनी केले नाहीत उपचार, नवजात बालकाचा मृत्यू

इंदुरीकर महाराज राज्यभर किर्तनाचे कार्यक्रम करून समाज प्रबोधनाचे काम करत असतात. आपल्या वेगळ्या शैलीमुळे इंदुरीकर घराघरात पोहचले आहेत. मात्र, अनेकदा त्यांना टीकेचं धनीही व्हावं लागलंय. असं जरी असलं तरी इंदुरीकर महाराजांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. याआधीही त्यांनी कोल्हापूर, सांगलीतल्या महापुराच्या वेळीही इंदुरीकर महाराजांनी  मदत दिली होती.

मिळणाऱ्या पैशातून त्यांनी शाळा बांधली आहे. तसंच अनेक निराधार मुलांच्या राहण्याची आणि शिक्षणाची जबाबदारी देखील इंदुरीकर महाराजांनी घेतली आहे.

आज कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला मदत करत त्यांनी जनतेला घरात राहण्याचे आवाहन केले आहे.

इंदुरीकर महाराज यांचे पत्र

First published: April 5, 2020, 1:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या