धक्कादायक! महाराष्ट्रात अफवेनं घेतले बळी, चोर समजून तिघांची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

धक्कादायक! महाराष्ट्रात अफवेनं घेतले बळी, चोर समजून तिघांची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

पालघर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, प्रवासी दरोडेखोर असल्याचं समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण करून हत्या केली.

  • Share this:

पालघर, 17 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संसर्गासोबतच सर्वात मोठं आव्हान अफवांचं आहे. याचाच फटका पालघरमधील प्रवाशांना बसला आहे. प्रवासी दरोडेखोर असल्याचं समजून त्यांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आहे. लॉकडाऊनदरम्यान रात्रीच्या वेळी तीन ते चार दरोडेखोर पालघरमध्ये वावरत असल्याची अफवा पसरली होती. त्याचा फटका खानवेलकडे जाणाऱ्या तीन प्रवाशांना बसला. गडचिंचले परिसरातील ग्रामस्थांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या तीन जणांना दगड आणि हातात मिळेल त्या साहित्याने बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली आहे.

हे वाचा-स्पेनमध्ये तासाला 20 लोकांचा होतोय मृत्यू, संपूर्ण गाव तयार करतंय शवपेट्या

गुरुवारी दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं. या प्रवाशांची विचारपूस केली पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील चारोटी गावाजवळ सारणी गावात देखील असाच एक प्रकार घडला होता. ठाणे येथील एका समाजसेवकाला मारहाण झाली होती. तसेच पोलिसांची गाडी आणि एका खासगी वाहनांवर दगडफेक करून वाहनाची तोडफोड करण्यात आली होती.

हे वाचा-नर्ससोबत धक्कादायक प्रकार, गर्दी करू नका असं सांगितलं म्हणून थेट गाडीच पेटवली

First published: April 17, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading