Home /News /maharashtra /

उद्धव ठाकरेंनी घेतला कठोर निर्णय; राज्यात कर्फ्यू लागू, रस्त्यावर फिरणं बंद

उद्धव ठाकरेंनी घेतला कठोर निर्णय; राज्यात कर्फ्यू लागू, रस्त्यावर फिरणं बंद

राज्यावरील कोरोनाचं संकट गडद होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

  मुंबई, 23 मार्च : जमावबंदीनंतरही राज्यातील रस्त्यांवर गर्दी सुरू होती. यामुळे राज्य सरकारने कठोर निर्णय घेत संचारबंदीची (curfew in state) घोषणा केली आहे. त्यामुळे अनावश्यपणे कोणालाही आता रस्त्यावर फिरता येणार नाही. 'राज्यात नाईलाज म्हणून संचारबंदी लागू करत आहोत. महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याचा निर्णय काल घेतला. आता जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक बंद करण्यात येत आहे,' अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचं राज्याला संबोधन, जाणून घ्या ठळक मुद्दे: कोरोना व्हायरसच्या धोकादायक वळणावर आलो आहे कोरोनाला रोखण्याची हीच वेळ आहे सरकार आपल्यासाठी काम करतंय त्याबद्दल लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद टाळ्या आणि थाळी वाजवणं म्हणजे व्हायरस पळवून लावणं नाही, तर डॉक्टर, जवान, पोलीस यांना अभिवादन करण्यासाठी होतं पुढच्या टप्प्यातील काही दिवस महत्वाचे आहे आता आंतरदेशीय वाहतूक बंद करावी अशी पंतप्रधानांकडे पत्रातून मागणी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू, पशुखाद्य दुकाने सुरू दवाखाने सुरू राहतील घाबरण्याचे कोणतेही कारण नाही कृषीउद्योग आणि त्याच्याशी संबंधित साहित्य देणारी आणि पूर्वणारी यंत्रणा सुरू राहील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे फक्त पुजारी, धर्मगुरू यांनाच परवानगी, इतरांसाठी प्रवेश बंदी खाजगी वाहतूक बंद, गरज अस्वल तरच प्रकाशला परवानगी हेही वाचा- कोरोनाचा असाही धसका, गावकऱ्यांनी थेट रस्त्यावर भलंमोठं झाड टाकून बंद केला रस्ता! रिक्षात चालक आणि 1 प्रवाशी गाडीत चालक आणि 2 अशी वाहतुकीला परवानगी ते सुद्धा अत्यावश्यक असेल तरच जिल्हाधिकारी, आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला वैद्यकीय क्षेत्रात मदत लागल्यास आशा स्वयंसेविका आणि होमगार्ड यांची मदत घेऊ त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे लोकांनी घाबरून जाऊ नका सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी प्रादुर्भाव झालेला नसला तरी संशयित असलेल्यांनी, क्वारंटाईन व्यक्तींनी घराबाहेर पडू नये सरकारने जे काही कठोर निर्णय घेतले आहेत ते लोकांच्या हितासाठीच आहेत

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Uddhav thackeray

  पुढील बातम्या