मुंबई, 12 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊन सरकार वाढवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, या संकटकाळात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि प्रशासन मात्र लोकांच्या सेवेसाठी अव्याहत काम करताना दिसत आहेत. कुटुंबापासून दूर कोरोनासारख्या संकटाला रोखण्यासाठी हे लोक उभे आहेत. यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांना भेटणंही कठीण झालं आहे. डॉक्टर लोकांना तर कुटुंबापासून दूरच रहावं लागत आहे. तर दिवसभर ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारीसुद्धा कोरोनाच्या धोक्यामुळे कुटुंबियात वावरतान काळजी घेतात. घरात संकट आले किंवा एखादी अडचण आली तर त्याआधी देशाच्या सेवेला ते प्राधान्य देतात. लॉकाडऊन असल्यानं सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे. यामुळे अनेक पोलीस कर्मचारी त्यांच्या कुटुंबापासून लांब आहेत. काहींची तर कुटुंबियांशी भेटही झालेली नाही. अशाच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीने लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या महिला पोलिसाच्या कर्तव्याला लोक सलाम करत आहेत. महिला पोलिसाच्या पतीने लिहिलं आहे की, मातृत्वाची सत्व परीक्षा… आज १ महिना झाला मुलापासुन माझी बायको दुर आहे. २४ तास ऊन्हात आणि रात्रभर कडक बंदोबस्त करत आहे. काल अचानक डोळ्यात पाणी आलं आणि मी विचारलं तर बोलली की पाय दुखत आहे. असं बोलली पण ते डोळ्यातील पाणी बघुन समजलं मला की मुलाच्या आठवणीतले पाणी आहे.
सध्याच्या कठीण परिस्थितीबद्दल गव्हाणे यांनी बोलताना म्हटलं की, परीस्थितीने परीक्षा घ्यायची ठरवली आहे. पण तुला मी शब्द देतो बायको. जेव्हा हे सगळं संकट दुर होईल तेव्हा तुला आणि मुलाला छान कुठेतरी फिरायला घेऊन जाईन. सलाम तुझ्या कार्याला. मित्रांनो कृपा करून घरात थांबा. कारण तुमच्या घरात थांबल्याने एक आईला तीच्या मुलाला लवकर भेटता येईल. हे वाचा : ‘माझं कुटुंब 4 दिवसांपासून उपाशी’, मुंबईतील मुलीचा अंगावर काटा आणणारा VIDEO भारतात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच महाराष्ट्र सरकारने राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत राहील असं स्पष्ट केलं आहे. लॉकाडऊनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एक पर्याय आहे. हे वाचा : भावाच्या मृत्यूनंतर डगमगली नाही, अंत्यसंस्कारानंतर कोरोनाच्या लढ्यात झाली तैनात