'माझं अख्खं कुटुंब 4 दिवसांपासून उपाशी', मुंबईतील मुलीचा अंगावर काटा आणणारा VIDEO

'माझं अख्खं कुटुंब 4 दिवसांपासून उपाशी', मुंबईतील मुलीचा अंगावर काटा आणणारा VIDEO

मुलीच्या व्हायरल झालेल्या टिकटॉक व्हिडिओने धारावीतील भयाण वास्तव समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीला कोरोनाचा विळखा पडण्याची भीती आहे. कारण दिवसेंदिवस धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. धारावीत आजही 15 नवे रुग्ण सापडल्याने धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या 43 वर पोहोचली आहे. अशातच एका मुलीच्या व्हायरल झालेल्या टिकटॉक व्हिडिओने धारावीतील भयाण वास्तव समोर आलं आहे.

धारावीतील एका मुलीने टिकटॉक व्हिडिओ करत आपण 4 दिवस उपाशी असल्याचं सांगितलं. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वॉर ऑफिसकडून तिच्या कुटुंबाला राशन पुरवण्यात आलं. या घटनेमुळे कोरोनाचा धारावीतील लोकांवर नक्की कसा परिणाम झाला आहे, याचा अंदाज येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण राजधानी मुंबईत आढळले आहेत. त्यातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्यास संपूर्ण राज्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. या पार्श्वभूमीर मुंबई महानगरपालिकेनं धारावीसाठी स्पेशल प्लॅन आखला आहे.

धारावीतील ज्या भागात जास्त संशयित आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल. ड्रोनच्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनिटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनकडून दीडशे डॉक्टर देण्यात येणार आहेत. ज्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाईल, अशी माहिती आहे.

त्यासोबतच दोन खाजगी डॉक्टरांबरोबर दोन बीएमसीचे डॉक्टर आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची टीम तयार केली जाणार आहे. अशा टीम धारावीतल्या साडेसात लाख रहिवाशांचे दहा दिवसात स्क्रीनिंग करतील.

First published: April 12, 2020, 5:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading