Home /News /maharashtra /

राज्यात आज दिवसभरात पुन्हा वाढले 3827 रुग्ण; गाठला नवा उच्चांक

राज्यात आज दिवसभरात पुन्हा वाढले 3827 रुग्ण; गाठला नवा उच्चांक

राज्य सरकार रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचा दावा करत असली, तरीही दररोज आदल्या दिवशीपेक्षा जास्त रुग्ण Coronavirus ची लागण झालेले सापडत आहेत. पाहा आजचे लेटेस्ट updates

    मुंबई 19 जून :  राज्यात रुग्णवाढीचा दर मंदावल्याचा दावा सरकारने कालच केला. पण तरीही दररोज नव्या रुग्णांचा उच्चांकी आकडा समोर येतोच आहे. आज दिवसभरात  3827 रुग्ण वाढले. कालचा आकडा 3752  होता. दिवसभरात Covid-19 मुळे 142 मृत्यूदेखील झाले आहेत. त्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईतले आहेत.  बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची वाढती संख्या ही दिलासादायक गोष्ट असली तरीही राज्याचा मृत्यूदर देशाच्या सरासरीच्या तुलनेत अधिकच आहे. देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 3.36 आहे. तोही गेल्याच आठवड्यात 2.8 वरून वाढून एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.74 झाला आहे. आज दिवसभरात 1935 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ कायम आहे. सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार  16 जूनच्या आठवड्यात रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 3 टक्क्यांवर आला आहे. तो 31 मे च्या आठवड्यात 4 टक्के होता.  कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली, तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने ही आकडेवारी समोर दिसत आहे. कोरोनाचं सावट! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गणेश मंडळांना केलं महत्त्वाचं अपील आज राज्यभरात 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदवला गेला आहे. त्यातील सर्वाधिक 124 मुंबईतले आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात दररोज 2 ते अडीच हजार नवे रुग्ण सापडत होते. त्या तुलनेत आता रोजची संख्या वाढतेच आहे.  राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 55651 आहे. तर 62773 रुग्णांना उपचारांनंतर बरं वाटलं आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 124331 झाली आहे. अनलॉक फेज सुरू झाल्यानंतर आता पावसाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 50.49 टक्के मृत्यूदर -  4.74 टक्के सध्या राज्यात 5,91,049  लोक होम क्वारंटाइन आहेत. 25,697 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 25.9  दिवसांवर गेला आहे. संकलन - अरुंधती अन्य बातम्या भारतात कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार 'हे' औषध; शरीरात व्हायरसचं संक्रमण रोखणार धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड, उपचाराअभावी दोन रुग्णांचा मृत्यू
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या