पुणे, 13 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. त्यातच मुंबई व पुण्यातील (Mumbai - Pune) वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाबाधितांवर (Covid - 19) नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. मात्र जे नागरिक या नियमाच पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.पुण्यात मास्कशिवाय फिरणाऱ्या एका 31 वर्षीय तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. हा तरुण पुणे कॅम्प (Pune Camp) परिसरात राहणारा आहे. हा तरुण मास्कशिवाय फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याशिवाय तो लॉकडाऊनचे उल्लंघन करीत फिरत होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी यावर तत्काळ कारवाई केली आहे. त्याच्यावर कारवाई करीत कोर्टात हजर करण्यात आले होते. याशिवाय त्याच्याकडून 1000 रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
Maharashtra: A 31-year-old man, a resident of Pune camp area, was convicted by Pune court today for not wearing a mask in public place and roaming outside while riding a vehicle during #CoronavirusLockdown. He was fined with Rs 1000 by the court today.
— ANI (@ANI) April 13, 2020
राज्य सरकारने नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर पडताना मास्क अथवा स्वच्छ रुमाल वा कापडाने नाक व तोंड झाकणे गरजेचे आहे. यातून फैलाव रोखण्यास मदत मिळते. मात्र अनेकजण या नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित - धक्कादायक! मुंबईतील 7 पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह रोनाग्रस्तांना जगवणारा Ventilator च जीवघेणा ठरतोय? मुंबईत कोरोनाबळी 100; बाधितांचा आकडा गेला 1549 वर

)







