मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गणेशोत्सवाआधीच धोक्याची घंटा! राज्यातील Active cases पुन्हा 50000 पार; बरी होणारी रुग्णसंख्याही घटली

गणेशोत्सवाआधीच धोक्याची घंटा! राज्यातील Active cases पुन्हा 50000 पार; बरी होणारी रुग्णसंख्याही घटली

गणेशोत्सवाआधीच राज्यात कोरोनाने रुद्रावतार धारण करायला सुरुवात केली आहे.

गणेशोत्सवाआधीच राज्यात कोरोनाने रुद्रावतार धारण करायला सुरुवात केली आहे.

गणेशोत्सवाआधीच राज्यात कोरोनाने रुद्रावतार धारण करायला सुरुवात केली आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 09 सप्टेंबर : गणेशोत्सव (Ganeshotsav) तोंडावर आला आहे. त्यात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाते आहे. गणेशोत्सवानंतर (Ganesh chaturthi) कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी शक्यता आहेत. पण आता गणेशोत्सवाआधीच धोक्याची घंटा मिळते आहे. गणेशोत्सवाच्या आधीपासूनच कोरोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. हे राज्याच्या आजच्या कोरोनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं (Coronavirus in Maharashtra).

राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाची आजची आकडेवारी जारी केली आहे (Maharashtra corona cases). त्यानुसार राज्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागल्याचं दिसतं आहे. राज्यातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा (Maharashtra corona active cases) म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा पुन्हा 50 हजार पार गेला आहे. तर बऱ्या होणाऱ्या रुग्णांचंही प्रमाण कमी झालं आहे.

हे वाचा - राज्यातल्या आरोग्य विभागाची किमया, लसीकरणात पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड

गेले काही दिवस राज्यातील कोरोना अॅक्टिव रुग्णांचा आकडा कमी-जास्त होत होता पण तो 50 हजारांच्या खालीच होता. आज मात्र अ‍ॅक्टिव्ह रुग्णांनी 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज दिवसभरात 4,219 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि  अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 50,229 वर पोहोचली आहे.

एकिकडे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढतो आहे, तर दुसरीकडे बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा मात्र कमी झाला आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. दररोज तीन हजारच्या आसपास आणि त्यापेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज मिळत होता. पण आज दिवसभरात फक्त 2,538 रुग्णांनाचा डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ऑक्टोबरमध्येच कोरोनाची तिसरी लाट

तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबरमध्ये (October) देशात कोरोनाची तिसरी लाट ( Third wave of Corona) येण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने (NIDM) एक अहवाल तयार केला आहे. ज्यात ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचा - Explainer - 60% लसीकरणानंतरही केरळात कोरोना ‘जैसे थे’! काय आहे यामागील कारण?

या अहवालात तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, जर देशात लसीकरणाचा वेग आणखी वाढवला नाही तर तिसऱ्या लाटेत संक्रमित लोकांची संख्या दररोज 6 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहेı

First published:

Tags: Corona spread, Coronavirus, Maharashtra