मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer - 60% लसीकरणानंतरही केरळात कोरोना ‘जैसे थे’! काय आहे यामागील कारण?

Explainer - 60% लसीकरणानंतरही केरळात कोरोना ‘जैसे थे’! काय आहे यामागील कारण?

केरळमध्ये लसीकरणानंतरही कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत.

केरळमध्ये लसीकरणानंतरही कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत.

केरळमध्ये लसीकरणानंतरही कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत.

    तिरुवनंतपुरम, 09 सप्टेंबर : संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third wave) भीती पसरली आहे. केरळसारख्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत (Kerala Corona cases) असल्यामुळे तिसरी लाट येणार असल्याची शक्यता सर्व व्यक्त करत आहेत. त्यातच आता केरळमध्ये निपाह विषाणूने बाधितांच्या (Nipah virus) मृत्युंचीही नोंद झाली आहे. त्यामुळे आधी कोरोना आणि आता निपाह अशा दुहेरी संकटात केरळ (Kerala covid-19 crisis) अडकले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सुमारे 60 टक्के लोकांचं कोरोना लसीकरण (Kerala vaccination details) झालं असूनही राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत (Kerala covid cases not decreasing) नाही आहे.

    केरळात सध्या दिवसाला तब्बल 20 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद (Kerala daily covid cases) होत आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर हा 10 टक्क्यांहून अधिक आहे. लसीकरणानंतरही कोरोनाची प्रकरणं वाढण्यामागे नेमकं काय कारण आहे?

    पहिल्या लाटेत कमी लोकांना कोरोनाची लागण

    टीव्ही 9 च्या रिपोर्टनुसार अमृता रुग्णालयातील डॉक्टर आणि प्राध्यापक डॉ. विद्या यांनी यााबबत बोलताना सांगितलं की,  ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये केरळमधील बहुतांश लोकांना या विषाणूची लागण झाली नव्हती. त्याच लोकांना आता या दुसऱ्या लाटेमध्ये (Kerala corona second wave) कोरोनाची लागण होत आहे. म्हणजेच, पहिल्या लाटेत जे लोक सुरक्षित राहिले होते, ते दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाग्रस्त होताना दिसून येत आहेत.’

    वृद्ध आणि आजारी व्यक्ती

    डॉ. विद्या यांनी केरळमध्ये वेगाने कोरोना पसरण्याचं आणखी एक कारण सांगितलं. ते म्हणजे, राज्यात वयोवृद्ध लोकांची (Kerala population) असलेली संख्या. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये सर्वाधिक वृद्ध लोक राहतात.

    हे वाचा - तिसऱ्या लाटेची चिन्हं? राज्यात कोरोनाबाधित बालकांच्या संख्येत महिन्याभरात वाढ

    यासोबतच मधुमेह, म्हणजेच डायबेटिस असणाऱ्या लोकांची संख्याही (Diabetic patients in Kerala) भरपूर आहे. वृद्ध व्यक्ती आणि डायबटीजचे रुग्ण यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे या लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यातच कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट (Delta variant in Kerala) अधिक घातक आहे. त्यामुळेच केरळात कोरोना रुग्णांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत अधिक दिसून येत आहे.

    कोरोना लशीचे दोन्ही डोस मिळाले नाहीत

    केरळमधील बहुतांश लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले नाही, हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. डॉ. विद्या सांगतात, की राज्यातील 60 टक्के नागरिकांना (Kerala vaccination update) कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. म्हणजेच सुमारे 40 टक्के लोकांचे लसीकरण अद्याप झाले नाही. दोन्ही डोस मिळालेल्या लोकांची संख्याही केवळ 20 टक्के असल्याची माहिती डॉ. विद्या यांनी दिली.

    हे वाचा - बापरे! 100 टक्के लसीकरण होऊनही इस्रायलमध्ये कोरोनाचा कहर, जगासमोर नवं आव्हान

    दरम्यान, राज्यात बुधवारी 30,196 नव्या कोरोना रुग्णांची (Kerala covid cases) नोंद करण्यात आली. यानंतर केरळमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 42,83,494 वर पोहोचली आहे. तसेच, बुधवारी झालेल्या 181 मृत्यूंनंतर, राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 22,001 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.

    First published:

    Tags: Corona spread, Corona vaccination, Coronavirus