Home /News /maharashtra /

पुण्यात कोरोना बळावतोय! 8 तासांत 15 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 30 वर

पुण्यात कोरोना बळावतोय! 8 तासांत 15 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 30 वर

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई, पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे

    पुणे, 12 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या सर्वात जास्त असून मुंबई व पुण्यातील (Mumbai - Pune) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज नाशिक या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 282 पर्यंत पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 30 वर पोहोचला आहे. आज पुण्यातील रुबी आणि एएफएमसी रुग्णालयातून प्रत्येकी एक रुग्ण, ससूनमधील 2 आणि नायडू रुग्णालयात 11 असे एकूण 15 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 282 पर्यंत पोहोचली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या 8 तासांच्या काळात पुण्यात 15 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. पीएमसी = 237 पीसीएमसी = 31 पीसीबी = 2 पुणे ग्रामीण = 12 आतापर्यंत पुण्यात 30 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ससून = 21 जिल्हा रुग्णालय = 1 दीनानाथ = 1 नोबेल = 2 जहांगीर = 1 सह्याद्री = 1 नायडू = 1 इनामदार = 1 पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी लॉकडाऊनचं पालन करावं यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहे. आज पुण्यातील रस्त्यावर गाढवा घराबाहेर पडू नको, असं लिहिण्यात आलं होतं. त्याशिवाय विविध आशयाच्या पाट्याही पुण्यातील रस्त्यांवर दिसत होत्या. काही दिवसांपूर्वी राज्यात मंडईत वा भाजी घेण्याच्या नावाखाली मोठी गर्दी होत होती. मात्र यावर पुढील दोन दिवस भाजी मंडईवर निर्बंध आणण्यात आले आहे. संबंधित - ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाला हरवलं, रुग्णालयातून डिस्चार्ज कोरोनाचा कहर असताना दिल्लीत भूकंपाचे धक्के, 'देवा काय आहे मनात?' संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या