BREAKING : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, एकूण बाधितांची संख्या 31 वर

BREAKING : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, एकूण बाधितांची संख्या 31 वर

पुणे शहरातील संख्या वाढत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण दगावला आहे

  • Share this:

पुणे, 12 एप्रिल : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri-chinchwad) येथे एका 45 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे (Covid -19) मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील हा पहिला मृत्यू आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या सर्वात जास्त असून मुंबई व पुण्यातील (Mumbai - Pune) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्तंत पिंपरी-चिंचवडमध्ये 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 12 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित  15 रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र यापैकी 1 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही 45 वर्षीय महिला असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या 2048 पर्यंत पोहोचली असून त्या सर्वांनी किमान 14 दिवसांसाठी व गरज भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यंत घरातच थांबावे लागणार आहे. घरात क्वारंटाइन करणाऱ्यांना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र कोणी असे आढळल्यास 8888006666 या सारथी हेल्पलाइनवर माहिती द्यावी असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केलं आहे.

आज पिंपरी-चिंचवड येथे 65 संशयित रुग्ण दाखल झाले असून यापैकी 1 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आज एका महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी ही माहिती दिली.

संबंधित -

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाला हरवलं, रुग्णालयातून डिस्चार्ज

कोरोनाचा कहर असताना दिल्लीत भूकंपाचे धक्के, 'देवा काय आहे मनात?'

संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

First published: April 12, 2020, 8:24 PM IST

ताज्या बातम्या