Home /News /maharashtra /

दाम्पत्याला सलाम! कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी पत्नी रुग्णालयात तर पती घर सांभाळून जातो ड्युटीवर

दाम्पत्याला सलाम! कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी पत्नी रुग्णालयात तर पती घर सांभाळून जातो ड्युटीवर

अमरावती जिल्ह्यात पती पत्नी कोरोना रुग्णांची सेवा करत असून यामुळे कुटुंबापासूनही दूर रहावं लागत आहे. पत्नी कोरोना रुग्णालयात ड्युटीवर असल्यानं पती घरची कामे सांभाळून आरोग्य सेवकाचे काम पार पाडत आहेत.

    अमरावती, 06 मे : जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासन सर्वजण झटत आहेत. कोरोनामुळे खासगी रुग्णालये बंद आहेत. मात्र, सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. अनेक ठिकाणी पती पत्नी कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. अमरावती जिल्ह्याच्या आरोग्य विभागातही असंच एक दाम्पत्य कर्तव्य बजावत आहे. घनश्याम मनोहर हे अमरावतीच्या नजीक असलेल्या शिराळा पुसदा या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. शिराळा गावात  ५ रुग्ण कोरोना बाधित आढळले यापैकी एकाचा मृत्यू झाला. ज्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला त्याच्या घरातील कुटुंबियांना क्वारांटाईन करण्याची जबाबदारी घनश्याम मनोहर यांनीच पार पाडली. त्यांच्या पत्नी दुर्गा मनोहर या कोविड रुग्णालयात स्टाफ नर्स आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून कोविड रुग्णालयात दुर्गा मनोहर या कोरोना बाधित रुग्णांना सेवा देत आहे. नुकतेच दुर्गा मनोहर यांना अमरावतीच्या पंजाबराव देशमुख प्रबोधिनीमध्ये 14 दिवसाकरीता विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. कोविड  रुग्णालयात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्यांना संक्रमण होऊ नये म्हणून कोविड रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या वस्तीगृहातचं राहावं लागतं. यामुळे जवळपास महिनाभर  दुर्गा या त्यांच्या कुटुंबियांना शकणार नाहीत. यामुळे मुले आई कधी येणार म्हणून चातकासारखी  वाट पाहत आहेत. हे वाचा : दिलासादायक! 44 पैकी 28 रुग्णांची कोरोनावर मात, जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल दरम्यान, पत्नी दुर्गा या घरी नसल्याने सकाळी मुलांना दूध,नाश्ता व जेवण हे स्वतः  घनश्याम मनोहर करतात. त्यानंतर शिराळा पुसदा येथे आपले कर्तव्य बजावतात. घनश्याम मनोहर यांची बाय पास सर्जरी झाली आहे. त्यानंतर नुकतंच त्यांचा अपघात झाला होता. या सर्व परिस्थितीही मनोहर दाम्पत्य कोरोना रुग्णांच्या सेवेत आहे. हे वाचा : व्हाल सुन्न..लेकराच्या डोक्यावरुन अखेरचा हात फिरवायची इच्छा अपूर्णच संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या