वाचून व्हाल सुन्न..लेकराच्या डोक्यावरुन अखेरचा हात फिरवायची इच्छा अपूर्णच, एका कोरोना योद्ध्याची कहाणी

कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या या योद्ध्याला आपल्या 3 वर्षांच्या मुलाची तब्येत बिघडल्याचे कळल्यानंतरही जाता आलं नाही. शेवटी..

कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या या योद्ध्याला आपल्या 3 वर्षांच्या मुलाची तब्येत बिघडल्याचे कळल्यानंतरही जाता आलं नाही. शेवटी..

  • Share this:
    लखनऊ, 6 मे : कोविड – 19 (Covid -19) या जीवघेण्या आजारात बाप आपल्या पोटच्या गोळ्याला शेवटची मिठीही मारू शकला नाही. तो लेकाच्या समोर उभा राहून फक्त ढसाढसा रडत होता. मात्र बापाला आपल्या लेकराला शेवटचा स्पर्शही करता आला नाही. ही अगतिकता आहे लखऊनमधील एका रुग्णालयात काम करणाऱ्या वॉर्ड बॉयची. लोकबंधू रुग्णालयात तैनात 27 वर्षीय कोरोना योद्धा मनीष कुमार दिवस-रात्र रुग्णांची सेवा करतात. शनिवारी रात्री जेव्हा मनीष वॉर्ड रुग्णांची सेवा करीत होते, तेव्हा त्यांना घरुन फोन आला. त्यांच्या 3 वर्षांच्या मुलाला श्वास घ्यायला त्रास होत होता. मनीष म्हणाले, ‘घरुन फोन आल्यानंतर मी अस्वस्थ झालो. मी तातडीने रुग्णांना सोडून घरी जावू शकत नव्हतो. कुटुंबीयांनी माझ्या मुलाला किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. मला दिलासा देण्यासाठी ते व्हॉट्सअपवर त्याचे फोटो पाठवत होते. रात्री साधारण 2 वाजता तो आमच्यातून निघून गेला.’ हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. मला आपल्या मुलाजवळ जायचं होतं. मात्र मी रुग्णांना अशा परिस्थितीत सोडून जाऊ शकत नाही. मात्र घरातून सतत कॉल येत होते आणि मीही बैचेन झालो होतो. शेवटी माझ्या सहकार्यांनी मला मुलाला भेटायला जाण्यास सांगितले. मनीष कसंबसं करुन रुग्णालयात पोहोचले. ते रुग्णालयाच्या आत गेले नाही. तर रुग्णालयाबाहेरच आपल्या लेकाच्या मृतदेहाची वाट पाहत राहिले. जसं मृतदेह बाहेर आलं तसं त्यांचं ह्रदय पिळवटून गेलं. कुटुंबीय मुलाला गाडीतून घरी घेऊन जात होते. तेव्हा मनीष आपल्या मोटरसायकलवर गाडीच्या मागे मागे जात राहिले. ते पुढे म्हणाले, ‘मला लेकाला जवळ घ्यायचं होतं, त्याच्या डोक्यावर हात फिरवायचा होता, पण मी काहीच करू शकत नव्हतो.’ ते घरातही गेले नाही. घरात अनेकजणं असल्याने कोरोना पसरण्याची शक्यता नाकारला येत नाही. त्यामुळे ते घराबाहेर गेटजवळ बसून राहिले. आता फक्त मुलाच्या आठवणी माझ्या सोबत असल्याचे मनीष सांगतात. मोबाइलमध्ये त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ आहेत. सध्या ते क्वारंटाइनमध्ये आहेत. काही दिवसात ते पुन्हा नोकरी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांची सेवा करुन मला जगण्याची ऊर्जा मिळेल असंही ते म्हणाले. हे वाचा - कोरोनाशी लढणाऱ्या SRPF च्या जवानांचे आधी केले जंगी स्वागत, त्यानंतर...
    First published: