Home /News /maharashtra /

दिलासादायक! 44 पैकी 28 रुग्णांची कोरोनावर मात, या जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

दिलासादायक! 44 पैकी 28 रुग्णांची कोरोनावर मात, या जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

महसूल, पोलीस प्रशासन आणि नागरिकांचं सहकार्य यामुळे हे शक्य झालं आहे...

अहमदनगर, 6 मे: मुंबई, पुण्यासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढ असताना अहमदनगर जिल्ह्यातून दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल सुरु झाली आहे. एकूण 44 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 28 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 14 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने वेळीच ठोस निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे. मुंबई, पुणे यानंतर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडत होते. ज्यावेळी राज्यातील इतर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसताना अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत होती, मात्र त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी जिल्ह्यात राबवलेल्या यंत्रणेचा सकारात्मक परिणाम झाला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी कुणावर जास्त विश्वास न ठेवता स्वतः रस्त्यावर उतरले आणि कधी प्रेमाने सांगून, कधी विनंती करून  तर कधी कायद्याचा बडगा उगारून नागरिकांना सांगण्यात आले. हेही वाचा.. पुण्यात गोल्डमॅनचं निधन, अंगावर साडेआठ किलो सोनं घालून दिली होती राष्ट्रवादीची मुलाखत आजही गाव पातळीवर एखादा पाहूणा आला तरी सरपंच, तलाठी फोन करुन सांगतात. तर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक चौकशी करतात. त्यामुळे महसूल, पोलीस प्रशासन आणि नागरिकांचं सहकार्य यामुळे हे शक्य झालं आहे असल्याचं बोललं जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात  जामखेड, अहमदनगर शहर, संगमनेर, या ठिकाणी सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले होते, नगर - 11, जामखेड -17, संगमनेर-8, राहाता - 1, नेवासे - 4, कोपरगाव - 1, आष्टी (जि. बीड) 1, पाथर्डी - 1 त्यात कोपरगाव-1 आणि जामखेड-1 अशा दोन रुग्णाचा मुत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात दिल्लीच्या मरकजमधून 29 परदेशी नागरिक आले होते. त्यातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने 26 जणांना लागण झाली होती. तर पाथर्डीमधील व्यक्ती हा मुंबईला शेवग्याच्या शेंगा विकण्यासाठी गेला होता. नेवासामधील रुग्ण हा दुबईला गेला होता. तर नगर मधील काही डॉक्टरांनी परदेशी वारी केली होती. त्या 44 कोरोना बाधित रुग्णानापैकी आठ जणांना परदेशी वारी करणाऱ्यांमुळे कोरोना झाला होता. हेही वाचा.. चिंताजनक! पुण्यात संसर्ग वाढला, कोरोनामुळे 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू संगमनेर, आलमगीर, मुकुंदनगरआणि जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले होते. जामखेड आणि संगमनेर अजूनही हॉटस्पॉट आहेत तर नगर मधील नवीन रुग्ण न सापडल्याने काही प्रमाणावर संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत 1644 व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी 1555 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आज राज्यतील अनेक जिल्हात रुग्णाची संख्या आटोक्यात येत नाही. मात्र चांगले नियोजन केल्यास ते शक्य होऊ शकते असेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आधिक्षक अखिलेश सिंह यांनी दाखवले आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या