कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटकांसाठी प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटकांसाठी प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

ठाणे जिल्ह्यातील धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.

  • Share this:

ठाणे, 20 जून: ठाणे जिल्ह्यातील धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग होवून त्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

हेही वाचा...गलवानमध्ये हिंसक संघर्ष! चीनच्या फसवणुकीनंतर भारतानं तयार केला 'प्लॅन बी'

ठाणे जिल्ह्यात मान्सून कालावधीत मोठ्या संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन ठाणे जिल्हयातील तालुका निहाय स्थळांना प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर सिद्धगड डोंगर नाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवीधरण परिसर भातसा धरण स्थळ, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळु चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदी किनारी, कळंबे नदी किनारा,घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा खोपवली, गोरखगड, सिंगापूर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेबे मुरबाड कसारा येथील सर्व धबधबे, कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर, कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी यांचा समावेश आहे.

धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणांच्या सभोवताली 1 किलोमीटर परीसरात 19 जूनपासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.

पावसामुळे निमार्ण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिश हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे. सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर/उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.

हेही वाचा...उद्धव ठाकरे म्हणाले, भारत मजबूत आहे, मजबूर नाही; डोळे काढून हातात देऊ

धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करणेस मनाई करणेत येत आहे. तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

First published: June 20, 2020, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading