Home /News /mumbai /

'सरकारी मेहमान घर आने वाले है' नवाब मलिकांचं खळबळजनक ट्वीट

'सरकारी मेहमान घर आने वाले है' नवाब मलिकांचं खळबळजनक ट्वीट

नवाब मलिक आणि समीर वानखेडे आरोप प्रत्यारोप प्रकरणाला आज धक्कादायक वळण मिळाले.

नवाब मलिक आणि समीर वानखेडे आरोप प्रत्यारोप प्रकरणाला आज धक्कादायक वळण मिळाले.

नवाब मलिक आणि समीर वानखेडे आरोप प्रत्यारोप प्रकरणाला आज धक्कादायक वळण मिळाले.

    मुंबई, 10 डिसेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (ncb) अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede)  यांच्यावर एकापाठोपाठ गंभीर आरोपांनी मालिका सुरू केली होती. पण, आता नवाब मलिक यांनी 'उद्या सरकारी पाहुणे घरी येणार आहे', असं सांगत खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे आरोप प्रत्यारोप प्रकरणाला आज धक्कादायक वळण मिळाले. नवाब मलिक यांनी कोर्टामध्ये वानखेडे कुटुंबावर आता आरोप करणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर संध्याकाळी एक खळबळजनक ट्वीट केलं. 'साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है' असं म्हणत मलिक यांनी सरकारी संस्थेकडून चौकशीचे संकेत दिले आहे. पण मलिक एवढ्यावरच थांबले नाही,  'डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से' असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला आहे. विशेष म्हणजे, वानखेडे कुटुंबावर मलिक यांनी पुराव्यानिशी आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडवून दिली होती. याच प्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांना ट्वीटपासून रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मलिक यांच्याविरोधात १ कोटी २५ लाखांचा अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. तसंच, मलिक यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यास मनाई करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. आज या प्रकरणी मलिक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. गुलाबी थंडीत फिरायला जाण्याचा विचार करताय? तर 'हे' शहर तुमची सहल अविस्मरणीय करेल या चार पानाच्या प्रतिज्ञापत्रात  नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. वानखेडे यांच्या कुटुंबावर मी कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नाही. त्यांच्याकडे दे पद आहे, त्याचा दुरुपयोग केला म्हणून मी आरोप केले होते. यापुढे कोणतीही विधाने करणार नाही, अशी हमीच मलिक यांनी कोर्टात दिली. पण, त्यानंतर मलिक यांनी ट्वीट केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या