मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

धक्कादायक! Delta Plus चा मुंबईत पहिला बळी; कोरोना लस घेतल्यानंतरही मृत्यू

धक्कादायक! Delta Plus चा मुंबईत पहिला बळी; कोरोना लस घेतल्यानंतरही मृत्यू

राज्यातील डेल्टा प्लस कोरोना मृतांचा आकडा आता दोनवर पोहोचला आहे.

राज्यातील डेल्टा प्लस कोरोना मृतांचा आकडा आता दोनवर पोहोचला आहे.

राज्यातील डेल्टा प्लस कोरोना मृतांचा आकडा आता दोनवर पोहोचला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 13 ऑगस्ट : राज्यात डेल्टा प्लस (Delta Plus) कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईत (Mumbai) डेल्टा प्लसने (Delta Plus patinet death in mumbai) पहिला बळी घेतला आहे.  महत्त्वाचं म्हणजे या रुग्णाने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते.

मुंबईतील (Mumbai delta plus) 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. या महिलेने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला मधुमेहासह इतर आजारही होते. शहरात नुकत्याच पॉझिटिव्ह आढळलेल्या सात रुग्णांपैकी ती एक होती, असं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिलं आहे.

राज्यातील डेल्टा प्लस मृतांची संख्या आता दोन झाली आहे. याआधी जूनमध्ये रत्नागिरीत एका महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला होता. ही महिला संगमेश्वर येथे राहणारी होती.

हे वाचा - VIDEO: आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियमाचं उल्लंघन

डेल्टा प्लस म्हणजे AY.1 हा डेल्टा व्हेरिएंटचं (Delta variant)  म्युटेशन आहे. जो अधिक संसर्गजन्य आहे. जूनमध्ये हा व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (variant of concern) असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली होती.

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण एप्रिलमध्ये सापडला होता. जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर जुलैमध्ये डेल्टा व्हेरिएंटची (Delta Variant) रुग्ण संख्या शून्यावर आली होती. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही, अशी दिलासादायक माहिती दिली.

हे वाचा - तीन महिन्यापूर्वी भयानक परिस्थिती, आता या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या Zero

पण आता ऑगस्टमध्ये डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 2 महिन्यांनंतर पुन्हा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत आणि आता आणखी एक बळीही गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

11 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 65 डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने आढळलेले 20 रुग्ण हे मुंबई, 7 पुणे, 3 नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी 2, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. 65 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 33 स्त्रिया आहेत. सर्वाधिक 33डेल्टा प्लस रुग्ण 19 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील 17 रुग्ण आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील 7 बालके असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Delta virus