जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! नामांकित फार्मा कंपनीत कोरोनाचा शिरकाव, 20 कर्मचाऱ्यांना लागण

धक्कादायक! नामांकित फार्मा कंपनीत कोरोनाचा शिरकाव, 20 कर्मचाऱ्यांना लागण

धक्कादायक! नामांकित फार्मा कंपनीत कोरोनाचा शिरकाव, 20 कर्मचाऱ्यांना लागण

नाशिकमधील एका नामांकित औषध निर्मित्या कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी), नाशिक, 14 जुलै: संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसनं आता थैमान घालतं आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता राज्यातील इतर शहर आणि ग्रामीण भागातही कोरोनाचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. त्यात नाशिकमधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील एका नामांकित औषध निर्मित्या कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ‘ग्लेनमार्क’ या नामांकित फार्म कंपनीतील 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाने आता थेट औद्योगिक वसाहतीत शिरकाव केल्यानं कामगार वर्गात मोठी दहशत पसरली आहे. हेही वाचा… बापरे! ढगफुटीसारखा पाऊस, 40 ते 50 एकरातील अंकुरलेली पिकं वाहून गेली ‘ग्लेनमार्क’ ही मेडिसीन आणि औषध निर्मिती करणारी कंपनी सातपूर औद्योगिक वसाहतीत आहे. या कंपनीतील तब्बल 20 कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. कोरोनाबाधित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, हे कर्मचारी काम करीत असलेला विभाग आता प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या घटनेमुळे मात्र सातपूर औद्योगिक वसाहतीत मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी कंपनी तयार करणार औषध दरम्यान, ‘ग्लेनमार्कट फार्मास्युटिकल्स (glenmark pharmaceuticals) या मुंबईतल्या औषध निर्मात्या कंपनीला कोरोनावर उपचारासाठी गोळी तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) ही परवानगी दिली आहे. अँटीव्हायरल औषध असलेल्या फेव्हिपिरावीर (Favipiravir) ला फॅबिफ्लू (FabiFlu) या नावाने कंपनी बाजारात आणणार आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे. या औषधाचं उत्पादन आणि मार्केटिंगसाठी कंपनीला परवानगी मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. हेही वाचा… कोरोनाचा कहर! CRPF आणि SRPFच्या 40 जवानांना लागण, रुग्णांनी ओलांडली शंभरी ‘ग्लेनमार्क’ ही 200 MG ची गोळी तयार करणार आहे. सध्या औषधाचे प्रयोग सुरू आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत असे प्रयोग करायला परवानगी दिली जात आहे. सुरुवातीला 1 हजार रुग्णांना ही गोळी देऊन त्याचा अभ्यास केला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात