मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भोंगळ कारभार..! कोरोना मृतांच्या यादीत चक्क 216 जिवंत व्यक्ती; बीडमधला धक्कादायक प्रकार

भोंगळ कारभार..! कोरोना मृतांच्या यादीत चक्क 216 जिवंत व्यक्ती; बीडमधला धक्कादायक प्रकार

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बीड (Beed) जिल्ह्यातील अंबेजोगाईत प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला.

बीड, 24 डिसेंबर: बीड (Beed) जिल्ह्यातील अंबेजोगाईत प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. जिवंत व्यक्तींची नावं कोरोना मयतांच्या यादीत समाविष्ट झाल्यानं हा प्रकार उघडकीस आला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 316 जणांची माहिती आरोग्य विभागाकडे (Health Department) आहे. मात्र आता याच यादीत 532 नावे आली आहेत. इतकेच नव्हे तर अंबाजोगाईत (Ambajogai) जिवंत व्यक्तींचीही नावे मयतांच्या यादीत समाविष्ट आहे. कोरोनाच्या महामारीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींना सरकारतर्फे 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य शासन स्तरावर झाला. यामुळं आता जिवंत व्यक्ती देखील मयताच्या यादीत आल्याने खळबळ उडाली.

सरकारच्या निर्णयानंतर महसूल आणि स्थानिक प्रशासन कोरोनातील मयत व्यक्तींची यादी तयार करत आहेत. या यादीची खातरजमा करण्यासाठी अंबाजोगाई शहरातील मयतांची यादी अंबाजोगाईचे तहसीलदार विपिन पाटील यांनी अंबाजोगाईचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पाठविली. नगर परिषदेच्या वतीने या यादीची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी करत असताना अनेक चमत्कारिक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा-  IPL 2022 : गॅरी कस्टर्न आयपीएलमध्ये पुन्हा परतणार, 'या' टीमचे होणार हेड कोच! 

अंबाजोगाई शहरात जिवंत असणाऱ्या व्यक्तींचाही मयत म्हणून समावेश आहे. येथील प्रशांतनगर परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ वारद यांचेही नाव मयतांच्या यादीत आले.

नगरपरिषदेचे कर्मचारी आज नागनाथ वारद यांच्या कुटुंबाकडे खातरजमा करण्यासाठी गेले. या वेळी खुद्द नागनाथ यांनाच आपले नाव मयतांच्या यादीत समाविष्ट असल्याचा धक्काच त्यांना बसला. हा प्रकार पाहून नगरपरिषदेचे पडताळणी करण्यासाठी गेलेले कर्मचारी ही आवाक झाले. असाच प्रकार त्याच परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या कुटुबांशी ही घडला. जिवंत व्यक्तींची नावे मयतांच्या यादीत समविष्टच झाली कशी?असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

हेही वाचा- VIDEO: अन् मंत्र्यालाच पडला विसर, मास्कच लावला नाही; आठवण येताच...

विशेष म्हणजे अंबाजोगाई तालुक्यात कोरोनामुळे 316 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मात्र मयतांच्या यादीत 532 नावांचा समावेश आहे. ही उर्वरित 216 नावे आली कुठून? याचा शोध आता प्रशासकीय यंत्रणेला घ्यावा लागणार आहे.यादीतील त्रुटी व चुका दुरुस्त करूनच यादी तयार केली जाईल असं अंबेजोगाईचे तहसीलदार विपिन पाटील यांनी फोनवरून सांगितले.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus cases