हिंगोली, 10 मे: कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे (Corona lockdown) अनेकांच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होतं आहे. त्यामुळे काहींना नैराश्य येत आहे. अशात कोरोना काळ आणि त्यात लग्नही (Marriage) जमत नाही, यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या तरुणानं आत्महत्या (suicide) केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा याठिकाणी घडली आहे.
रविवारी पहाटे त्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून त्यांनी घटनास्थळी येऊन पाहाणी केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. सचिन गोविंदराव गायकवाड असं संबंधित मृत तरुणाचं नाव असून तो आपल्या आई वडिलांसोबत खंडाळा याठिकाणी राहात होता.
मागील काही दिवसांपासून अनेक प्रयत्न करूनही लग्नासाठी नवरी मिळत नव्हती. त्यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या तरुणाचा लॉकडाऊनमुळे आणखी एकटेपणा वाढला. लग्न जमत नाही आणि त्यात कोरोनाचा काळ या दुहेरी परिस्थितीमुळे नैराश्यात गेलेल्या तरुणाने रविवारी पहाटे 2 च्या सुमारास आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे.
हे ही वाचा-खळबळजनक! भारतात पत्नीनं गळफास घेतल्यानंतर जर्मनीत पतीनं उचललं टोकाचं पाऊल
सकाळी त्याचे आई वडील जागे झाले असता, त्यांना मुलगा सचिनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. आपल्या तरण्या मुलाचा मृतदेह अशा अवस्थेत पाहून त्यांना धक्काच बसला. या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके आपल्या पोलीस पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी त्यांनी घटनास्थळाची पाहाणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
हे ही वाचा-...अन् आई-भावानं डोळ्यादेखत सोडले प्राण; क्षणात हरपलं 3 वर्षाच्या मुलीचं विश्व
तसेच मृताचे नातेवाईक अर्जुन गायकवाड यांच्या माहितीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे या करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathwada, Marriage, Suicide