Home /News /maharashtra /

लघुशंकेला जातो असं सांगून कोरोनाबाधित रुग्ण गेला हॉस्पिटलच्या टेरेसवर अन्...

लघुशंकेला जातो असं सांगून कोरोनाबाधित रुग्ण गेला हॉस्पिटलच्या टेरेसवर अन्...

वाडा येथील हा 38 वर्षीय रुग्ण कोरोनाबधित असून वाड्यातील पोशेरी उपचार केंद्रामध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते.

पालघर, 6 सप्टेंबर: पालघर जिल्ह्यातील वाडा येथे राहणाऱ्या एका अत्यवस्थ कोरोनाबाधित रुग्णानं विक्रमगड येथील रिव्हेरा समर्पित कोरोना हॉस्पिटलच्या टेरेसवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रुग्णाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे. हेही वाचा...शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO मिळालेली माहिती अशी की, वाडा येथील हा 38 वर्षीय रुग्ण कोरोनाबधित असून वाड्यातील पोशेरी उपचार केंद्रामध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तो अत्यवस्थ झाल्याने त्याला अतिदक्षता कक्षात उपचाराची आवश्यकता होती. त्याला शनिवारी रात्री विक्रमगड येथील रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळच्या सुमारास लघुशंकेला जात असल्याचे येथील कर्मचाऱ्यांना सांगत तो स्वच्छतागृहाकडे न जाता थेट रिव्हेरा रुग्णालयाच्या गच्चीवर गेला. तिथून त्याने रुग्णालयाच्या मागच्या बाजूला उडी घेतली. तिथे तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला ही घटना समजल्यानंतर त्याने लगेचच रुग्णालयाच्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी ही बाब सांगितली. रुग्णानं टेरेसवरुन उडी मारल्याचे कळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून त्याला पुन्हा रुग्णालयात आणून तातडीचे उपचार सुरू केले. हेही वाचा...हात सॅनिटाइझ करून पेटवली मेणबत्ती अन् झाला स्फोट, नेमकं काय घडलं वाचा तातडीच्या उपचारांमुळे संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरनी सांगितले. त्याचबरोबर अधिक उपचारांसाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टरांनी यावेळी दिली.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Palghar, Palghar accident

पुढील बातम्या