मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /पॉझिटिव्ह बातमी! Coronavirus शी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या

पॉझिटिव्ह बातमी! Coronavirus शी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या

सर्वात पहिले कुणाला ही लस द्यायची यावरही विचार सुरू आहे. लहान मुलांना वगळून पहिले जास्त धोका असलेल्या ज्येष्ठांना ही लस द्यायची का यावरही विचार सुरू आहे.

सर्वात पहिले कुणाला ही लस द्यायची यावरही विचार सुरू आहे. लहान मुलांना वगळून पहिले जास्त धोका असलेल्या ज्येष्ठांना ही लस द्यायची का यावरही विचार सुरू आहे.

या अँटिबॉडीजमुळे आता पॅसिव्ह लस लवकर तयार होऊ शकते, असा दावा संशोधकांकडून करण्यात येत आहे.

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : कोरोना विषाणू (Coronavirus) आणि त्याच्याविरोधातील लस (Corona vaccine) याबाबत सतत उलट सुलट बातम्या येत आहेत. लशीची प्रतीक्षा वाढते आहे. अशा स्थितीत एक पॉझिटिव्ह बातमी आली आहे. कोरोना विषाणूशी लढणाऱ्या नव्या प्रभावी अ‍ँटिबॉडी शास्त्रज्ञांना आढळल्या आहेत. या अँटिबॉडीजमुळे आता पॅसिव्ह लस लवकर तयार होऊ शकते, असा दावा संशोधकांकडून करण्यात येत आहे.

दररोज नवनवे अभ्यास समोर येत आहेत. कोरोना विषाणूशी लढणार्‍या प्रभावी अँटिबॉडी सापडल्याचा दावा संशोधकांनी केला असून त्या पॅसिव्ह लशीमध्ये  उपयोगी ठरणार असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

अक्टिव्ह लस असेल तर लशीचा डोस दिल्यानंतर शरीरात अँटिबॉडी तयार व्हाव्या लागतात. या प्रोसेसला वेळ लागू शकतो. तर पॅसिव्ह लशींमध्ये अ‍ॅक्टिव्ह अ‍ँटिबॉडीज रुग्णांना आधीच दिल्या जातात. त्यामुळे याचा परिणाम झटपट दिसतो.  सेल (Cell journal) या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

जर्मन सेंटर फॉर न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीज (DZNE) आणि चारिटे - यूनिव्हर्सिटीसमेडिज़िन बर्लिनच्या  संशोधकांनी  कोरोनाला मात देणार्‍या रुग्णांच्या रक्तातून वेगवेगळ्या  600 अँटिबॉडी काढल्या, प्रयोगशाळेतील तपासणीत वैज्ञानिकानी त्यातून कोरोनाप्रतिकारक अक्टिव्ह अँटिबॉडीजला ओळखून या अँटिबॉडीज  प्रभावी लस तयार करायला खुप उपयोगात येतील असा निष्कर्ष काढला.

संशोधकांचे म्हणणे आहे की लहान आकार असल्याने हा मॉलिक्यूल कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्यात पेशींची क्षमता वाढवणार आहे.  ही लस माणसांच्या  पेशींशी जोडली जात नाही हा एक चांगला संकेत आहे, त्यामुळे याचे दुष्परिणाम अगदीच कमी आहेत.

अँटिबॉडी पेशींना रोगाशी लढण्यास मदत करतात. हॅमस्टरच्या संशोधनानुसार विषाणूंची लागण झाल्यानंतर अँटिबॉडी दिल्यास सौम्य लक्षणं जाणवू शकतात जर संसर्गाच्या आधी त्या दिल्या तर लक्षणे दिसत नाहीत, असं संशोधन प्रकल्पाचे समन्वयक जाकोब क्रेय यांनी म्हटले आहे. अँटिबॉडी आणि उपचार यांचा एक मोठा इतिहास आहे. प्लाझ्मा दानातूनही याची चाचपणी केली जात आहे, कोरोनामधून बर्‍या झालेल्या रुग्णांच्या अँटिबॉडी दिल्या जातात. सर्वात प्रभावी अँटिबॉडीजचं नियंत्रित स्वरूपात निर्माण केलं जातं, असं मोम्सन रिनके यांचं म्हणणं आहे, तर आपल्या तीन अँटिबॉडीज क्लिनिकल ट्रायलसाठी आशादायी असल्याचं या प्रकल्पाचे हेरिटेज प्रीसियस यांनी म्हटलं आहे. या अँटीबॉडीजच्या सहाय्याने पॅसीव्ह लसीकरण  तयार करण्यास मदत होणार आहे. लसीबाबत रोज मोठ-मोठी संशोधनं होत असून नवनवीन माहिती समोर येत आहे. लशीची सर्वत्र प्रतीक्षा आहे. दरम्यान, या आधी प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग भारतासह विविध देशांत राबवला जात आहे. काही ठिकाणी तो थांबवण्यात आला होता. लस कधी येईल, याबाबत ठोस कसलंही उत्तर मिळालेलं नाही, परंतु स्व-सुरक्षा हीच महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते.

First published:

Tags: Coronavirus