जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फडणवीस आणि अजितदादांना कोरोनाची लागण, चंद्रकांत पाटलांची तुफान टोलेबाजी, VIDEO

फडणवीस आणि अजितदादांना कोरोनाची लागण, चंद्रकांत पाटलांची तुफान टोलेबाजी, VIDEO

फडणवीस आणि अजितदादांना कोरोनाची लागण, चंद्रकांत पाटलांची तुफान टोलेबाजी, VIDEO

‘आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोघांना भेटण्यासाठी कोरोनाचा व्हावा लागतो, असं काही नाही’

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 27 ऑक्टोबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना कोरोनाची लागण (Corona positive) झाली आहे. अजित पवार यांच्यावर खासगी हॉस्पिटल तर फडणवीस यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे ‘दोघांना भेटण्यासाठी कोरोना होण्याची गरज नाही’, असा खुमसदार टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची सुनावणी 4 आठवडे पुढे ढकली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाल्यावर टोलेबाजी केली आहे.

जाहिरात

‘देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आधीच सांगितले होते की, कोरोनाची लागण झाल्यावर सरकारी रुग्णालयात दाखल होणार. त्यानुसार त्यांच्यावर आता सेंट जॉन्स शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ते ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. अजितदादाही ब्रीच कँडीतच आहे, त्यामुळे ते एकमेकांशी चर्चा करत असतील, पण कोरोनामुळे एकमेकांना भेटता येत नसेल’, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. नागराज मंजुळे घेऊन येतायत तार; लवकरच दिसणार ‘पोस्टमन’च्या भूमिकेत ‘आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोघांना भेटण्यासाठी कोरोनाचा व्हावा लागतो, असं काही नाही आणि त्यांना भेटायला हॉस्पिटल हे एकच साधन आहे, असंही नाही’ अशी टोलेबाजीही पाटील यांनी केली. अजित पवार कोरोनामुक्त होऊन लवकर घरी यावेत म्हणून बा विठ्ठलाला साकडं… ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकारला रस नाही आणि गांभीर्यसुद्धा नाही. सरकारच्या मनात नेमकं आहे तरी काय? मराठा आरक्षणाच्या बाबतीत आज सुप्रीम कोर्टात जे झालं त्यावर या सरकारला आरक्षण देण्यात रस नाही, सरकार बेपर्वा आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात