कोरोनावर वरदान ठरले नेहमी मिळणारे 'हे' इंजेक्शन, पण होतोय काळाबाजार!

कोरोनावर वरदान ठरले नेहमी मिळणारे 'हे' इंजेक्शन, पण होतोय काळाबाजार!

हे लक्षात यायला सरकारला इतका वेळ का लागला आणि लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ लोकांवर आली असताना हजारो रुपयांचे हे औषध लोकांना परवडणार कसं?

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे  कोरोना बाधितांना दिल्या जाणाऱ्या एक्टेमेरिया इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे.

ज्यांना करोनाची लागण झाली आहे त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता टॉसिलिझम्ब एक्टेमेरिया 400 एमजी  तसंच रेमिडीसेव्हर 100 एमजी या दोन महागड्या इंजेक्शनची गरज असते. मात्र, ही इंजेक्शन कुठेच मिळत नसल्याने या इंजेक्शनचा काळा बाजार केला जात आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या नागरिकांना आता इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड बसत आहे.

सांगली हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या

कोरोनाची लागण झालेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीवर रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहे. त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी टॉसिलीझीम 400 एमजी या इंजेक्शनची नितांत गरज आहे. त्यासाठी गेली 3 दिवस सादिक सुर्वे शेकडो किलोमीटर फिरले. शेवटी घाटकोपर येथे S K Distributor येते त्यांना हे औषध मिळेल, ही माहिती मिळाल्यानंतर ते थेट या औषधाकरता रत्नागिरीहून मुंबईला 7 ते 8 हजार रुपये खर्च करुन आले.

सादिक सुर्वे यांना इंजेक्शन मिळाले मात्र डिस्टब्युटर्सच्या डेबिट मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण आल्याने पुन्हा एटीएम मध्ये पैसे काढायला सादिक गेले. पण त्यांच्या एटीटीएम कार्डाची लिमिट 25 हजाराचं असल्याने वरचे 6 हजार 500 रुपये कुठून आणायचे यामुळे त्यांचा संपुर्ण दिवस इंजेक्शन घेण्यातच गेला. सादिक सारखे अनेक सामान्य लोकं आहेत ज्यांना टॉसिलिझिम हे इंजेक्शन मिळवण्याकरता अडचणींचा सामान करावा लागत आहे.

धक्कादायक म्हणजे, या इंजेक्शनचा आता काळा बाजार केला जात आहे. 31 हजार 500 रुपयांना मिळणारे हे इंजेक्शन आता 40 हजार ते 1 लाख 14 हजार रुपयांपर्यत विकले जात आहे.

रुग्णांचा लूट! कोरोनाच्या महामारीत पुण्यात उघडकीस आला धक्कादायक प्रकार

टॉसिलिझिम 400 एमजी या इंजेक्शनमुळे प्रतिकार शक्ती वाढते अणि कोरोनाचा रुग्ण लवकर बरा होतो. हे अनेकांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा काळाबाजार सुरू झाला आहे. हे सरकारला कळताच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी हे इंजेक्शन सप्लाय करणाऱ्या डिस्ट्रीब्युटरकडे अचानक भेट दिली.

खरंतर गेल्या काही महिन्यापासून टीसिलिझिम 400 एमजी हे औषध कोरोना रुग्णांना वरदान ठरत आहे, हे लक्षात यायला सरकारला इतका वेळ का लागला आणि लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ लोकांवर आली असताना हजारो रुपयांचे हे औषध लोकांना परवडणार कसं? याच्या किंमतींवर सरकार नियंत्रण आणणार का? लोकांना सरकार दिलासा देणार का? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे कुणाकडेच नाही.

Published by: sachin Salve
First published: July 10, 2020, 3:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या