• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • पोटनिवडणुकीच्या ड्यूटीवरुन आलेल्या शिक्षकासोबत कोरोनाही आला घरी, 4 दिवसात संपलं हसतं-खेळतं अख्खं कुटुंब

पोटनिवडणुकीच्या ड्यूटीवरुन आलेल्या शिक्षकासोबत कोरोनाही आला घरी, 4 दिवसात संपलं हसतं-खेळतं अख्खं कुटुंब

Corona Outbreak: अलीकडेच पार पडलेली पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक अनेक कुटुंबीयांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. या निवडणुकीत इलेक्शन ड्युटीवर असणाऱ्या एका शिक्षकाचं अख्खं कुटुंब कोरोनामुळे उद्धवस्त झालं आहे.

 • Share this:
  सांगोला, 09 मे: अलीकडेच पार पडलेली पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक अनेक कुटुंबीयांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. निवडणूका पार पडल्यानंतर काही दिवसांतच पंढरपूर आणि मंगळवेढा ही शहरं कोरोना विषाणूचे नवीन हॉटस्पॉट बनले आहेत. दरम्यानच्या काळात निवडणुकीत मतदानासाठी आलेल्या मतदारांसोबत अनेक कार्यकर्ते आणि निवडणूक ड्युटी निभावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हीच पोटनिवडणूक सांगोल्यातील एका शिक्षकासाठी सर्वस्व हिरावून नेणारी ठरली आहे. पंढरपूर पोटनिवडणूक आटोपून घरी परतलेल्या शिक्षकानं आपल्यासोबत कोरोना विषाणूही घरी नेला. घरी गेल्यानंतर दोन दिवसांत त्यांना विविध शारीरिक समस्या जाणवू लागल्या. निवडणुकीतील तणावामुळे होतं असेलं, असं त्यांना वाटलं. पण कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पहिल्या दोन दिवसांतच त्याचं अख्खं कुटुंबही कोरोनाच्या कचाट्यात सापडलं. मतदान कर्मचारी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडून घरी परतलेल्या शिक्षकाच्या घरात कोरोनानं शिरकाव केल्यामुळे, अवघ्या चार दिवसांत हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं आहे. दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मृत शिक्षकाचं नाव प्रमोद वसंतराव माने (वय 50) असून ते जगधनेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत होते. यांची पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान कर्मचारी म्हणून ड्युटी लावण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी 17 एप्रिल रोजी आसबेवाडी (ता. मंगळवेढा) याठिकाणी निवडणूक कर्मचारी म्हणून सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी सलग बारा तासांची ड्युटी निभावली होती. निवडणुकीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्व साहित्य पंढरपूर याठिकाणी जमा  केलं आणि आपल्या घरी गेले. हे ही वाचा-15 दिवस मृत रुग्णाला जिवंत सांगत राहिले डॉक्टर, कारण समजताच हादरले कुटुंबीय घरी आल्यानंतर दोन-तीन दिवसांतचं शिक्षक प्रमोद माने यांच्यासह त्यांचे वडील वसंतराव माने, आई शशिकला माने आणि मावशी जयश्री कोडग यांनाही कोरोनाची लागण झाली. या सर्वांवर  सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. पण प्रमोद माने यांना डायबेटिसचा त्रास असल्यानं त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत नेण्यात आलं. तर दुसऱ्याच दिवशी आई आणि वडीलांनाही मुंबईत उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर मावशी जयश्री कोडग यांनाही मुंबईत दाखल करण्यात आलं. हे ही वाचा-Corona Vaccination : कोरोना लसीकरणात भारतासमोर आता नवं आव्हान या सर्वांवर मुंबईत उपचार सुरू असताना प्राथमिक शिक्षक असणारे प्रमोद माने यांचा 4 मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर लागोपाठ मावशी जयश्री कोडग (वय 68) याचं 5 मे रोजी, वडील वसंतराव माने (वय 75) यांचं 6 मे रोजी तर प्रमोदची आई शशिकला माने (वय 70) यांचं 7 मे रोजी निधन झालं. एकाच कुटुंबातील चार जणांचा एकामागून एक निधन झाल्यानं माने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: