जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पंढरपुरात कुंभार घाटावर 20 फूट उंच भिंत कोसळली, 6 ठार ; शोधकार्य सुरू

पंढरपुरात कुंभार घाटावर 20 फूट उंच भिंत कोसळली, 6 ठार ; शोधकार्य सुरू

पंढरपुरात कुंभार घाटावर 20 फूट उंच भिंत कोसळली, 6 ठार ; शोधकार्य सुरू

पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. कामाच्या जवळच या लोकांनी छोट्या छोट्या झोपड्या टाकल्या होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

पंढरपूर, 14 ऑक्टोबर : पंढरपूर शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन बांधकाम कोसळले आहे.  आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे. अद्यापही प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आङे. पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून हे घाट बांधणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. चुना वापरून दगडाचे बांधकाम केलेले आहे.  मात्र कुंभार घाटावर असणार हे बांधकाम तिथेच राहणाऱ्या काही लोकांच्या अंगावर कोसळले. यामध्ये आत्तापर्यंत 6 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. नवी नियमावली, मेट्रो उद्यापासून सुरू, 50 टक्के शिक्षकांना शाळेत येण्यास मुभा प्रशासनाकडून अद्यापही शोधकार्य सुरू आहे. कुंभार घाटा जवळील या नवीन घाटाचे सुशोभीकरणाच्या कामाच्या जवळच या लोकांनी छोट्या छोट्या झोपड्या टाकल्या होत्या.  त्या ठिकाणी ते  फुल विक्री प्रसाद विक्री नारळ विक्रीचा व्यवसाय करत होते. आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र, आज दुपारी दीडच्या सुमारास मुसळधार पावसाने नवीन घाटाचे बांधकाम कोसळले. सुमारे  20 फूट उंचीची भिंत या लोकांच्या अंगावर कोसळली. यामध्ये सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये गोपळ अभंगराव, राधा अभंगराव, मंगेश अभंगराव, पिलू जगताप, इतर अनोळखी व्यक्तीचे मृतदेह सापडले. काळ्या जादूमुळे वडील गेले, मुलांनी बदला घेण्यासाठी रचला डाव, पण… घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहे. ढिगाराखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात