• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही' काँग्रेस नेत्याची पवारांवर टीका

'काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही' काँग्रेस नेत्याची पवारांवर टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूप कष्ट केले आहेत. त्याची पोचपावती मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

  • Share this:
सोलापूर, 10 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP )हा नऊ जिल्ह्यांपुरताच पक्ष आहे तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष (Congress Party) आहे. त्यामुळे आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) काँग्रेसची होणारी घुसमट आणि सापत्न वागणुकीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांची भूमिका पटवून दिली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढविण्यास पक्षश्रेष्ठींकडून होकार आल्याचा दावा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी (Bhanudas Mali) यांनी केला आहे. भानुदास माळी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष माळी म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. परंतू कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली मंत्रिपदं आणि मिळणारा निधी हा राष्ट्रवादी-शिवसेनेला मिळणाऱ्या निधीपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात प्रचंड नाराजी पसरली आहे. या सर्वांमुळे  आगामी काळातील निवडणुकांत कॉंग्रेस पक्ष  स्वबळावर लढणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या सूचनेवरूनच मी राज्यभर ओबीसी समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी दौरे करीत असून सोलापूर हा 21 वा जिल्हा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये आम्हाला गणले जात नसून राज्यभर कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याचा सूर मला या दौऱ्यात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आम्ही आगामी काळातील निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवल्याचा पुनरूच्चार त्यांनी स्पष्टपणे केला. मोठी बातमी! रत्नागिरीतील पंदेरी धरण फुटीचा धोका टळला; गळती रोखण्यास प्रशासनाला यश भाजपाकडून आरक्षणमुक्त भारताचा प्रयत्न 2009 ते 2013 या काळामध्ये आमच्या सरकारने सामाजिक सर्वेक्षण करून इम्पीरियल डाटा तयार केला होता. तोच डाटा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आरक्षणमुक्त भारत करण्याचा डाव आरएसएसच्या माध्यमातून भाजपने रचल्याचा गंभीर आरोपही भानुदास माळी यांनी यावेळी केला. दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण न भेटल्यास त्यांना पक्षांतर्गत आरक्षण देऊन निवडणुकीत संधी दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार प्रणिती शिंदे यांचे मंत्रिपद फिक्स ओबीसी समाजाच्या अडीअडचणी राज्य व केंद्र स्तरावर ठामपणे मांडणे आवश्यक आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूप कष्ट केले आहेत. त्याची पोचपावती म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांना निश्चितपणे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून मंत्रिपद मिळेल असा विश्वासही भानुदास माळी यांनी व्यक्त केला.
Published by:Sunil Desale
First published: