मुंबई, 14 नोव्हेंबर: राज्यात (Maharashtra) तब्बल आठ महिन्यांनी मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं उघडणार आहेत. पाडव्याला अर्थात सोमवार, 16 नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav thackeray) यांनी केली आहे. राज्य सरकारच्या (Maharashtra Government) या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असलं तरी काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री कालपर्यंत दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असं सांगत होते. मात्र, त्यांनी आज अचानक मंदिरं उघडण्याचा निर्णय जाहीर केला. याचं आश्चर्य वाटतं, असंही निरुपम यांनी म्हणत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. हेही वाचा… भाजपच्या आचार्य तुषार भोसले यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय हेडलाइन घेण्यासाठी आहे की यामागे काही प्रशासकीय धोरण आहे?, असा टोला संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
पूजा स्थलों को खोलने का फैसला मान्य है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 14, 2020
लेकिन कल-परसों मुख्यमंत्री ने जोर से कहा कि दिवाली के बाद #कोरोना की नई लहर आएगी और आज यह फैसला ?
चौंकानेवाला नहीं लगता ?
ये फैसले हेडलाइन बनाने के लिए हैं या किसी प्रकार की प्रशासनिक रणनीति भी है ? #MaharashtraUnlock#Temples
संजय निरुपम यांनी ट्वीट करत म्हटलं की, धार्मिकस्थळं सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण दिवाळीनंतर कोरोनाची नवी लाट येणार असल्याचं मुख्यमंत्री कालपरवापर्यंत जोर लाऊन सांगत होते. पण त्यांनी अचानक मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला? हा निर्णय आश्चर्यकारक वाटत नाही का?, असा सवाल करतानाच हा निर्णय वृत्तपत्रांच्या हेडलाइनसाठी घेतलाय की यामागे काही प्रशासकीय धोरणही आहे, असा टोला देखील संजय निरुपम यांनी लगावला. दुसरीकडे, भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नीतेश राणे यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. भाजपनी सरकारचे डोळे उघडले म्हणूनच मंदिराचे दारे उघडले, असं नीतेश राणे यांनी म्हटलं आहे. मंदिर उघडण्याच्या निर्णयानंतर आमदार नीतेश राणे यांनी एक ट्वीट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपनी सरकारचे डोळे उघडले म्हणूनच मंदिराचे दारे उघडले, असं सांगत नीतेश राणे यांनी महाराष्ट्र भाजप (@BJP4Maharashtra), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (@ChDadaPatil) आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात गेल्या आठ महिन्यांपासून लॉकडाऊन होता. परिणामी राज्यातील मंदिरंही बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत टप्प्या टप्प्यानं लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. हेही वाचा.. मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही शब्द, अनवाणी पायानं बैलगाडा ओढत बळीराजानं काढली… राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? असा सवाल करत राज्यातील मंदिरं खुली करावी, ही मागणी विरोधी पक्षानं लावून धरली होती. यावरून भाजपविरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा सामनाही रंगला होता.