जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पवारांच्या वक्तव्याने 'महाविकासआघाडी'चं कनफ्यूजन, शिंदेंनी एका वाक्यात संपवला विषय

पवारांच्या वक्तव्याने 'महाविकासआघाडी'चं कनफ्यूजन, शिंदेंनी एका वाक्यात संपवला विषय

महाविकासआघाडीबाबत पवारांचं वक्तव्य, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

महाविकासआघाडीबाबत पवारांचं वक्तव्य, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

शरद पवारांनी केलेल्या महाविकासआघाडीबाबतच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल : गेल्या महिनाभरात अजित पवारांच्या भाजप जवळीकीच्या चर्चेनं वेळोवेळी महाविकासआघाडीतील एकोप्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देत, महाविकासआघाडी एकसंध असल्याचं सांगितलं, पण, आता स्वत: शरद पवारांनी महाविकासआघाडीच्या भविष्यावर प्रश्नार्थक विधान केल्यानं संभ्रम निर्माण केला. राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातील सांगता येणार नाही, असं वक्तव्य पवारांनी केलं. महाविकासआघाडी आज आहे, पण उद्याचं सांगता येत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढण्याची इच्छा आहे, पण नेहमीच इच्छा पुरेशी नसते. जागा वाटपाबद्दल अजून ठरलेलं नाही, शरद पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या. चर्चा सुरू झाल्यानंतर अखेर शरद पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. महाविकास विकास आघाडी विषयी जे काही बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. जागा वाटपची चर्चा झाली नाही, तर मी कसं सांगू की महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही. जागावाटप नंतरच कळेल की कोण किती जागा लढवत आहे. महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. यामुळे भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका’, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘पवार साहेब अनुभवी नेते आहेत, त्यांच्या वक्तव्याला महत्त्व असतं, गांभीर्य असतं, मी एवढंच म्हणेन,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतही समोर आले आणि त्यांनी भूमिका मांडली. ‘शरद पवारांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला जातोय. या क्षणी महाविकासआघाडी अत्यंत मजबूत आहे. महाविकासआघाडीच्या एकत्र सभा आम्ही एक आहोत, हे सांगण्यासाठीच होत आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात