ठाण्यातही संपूर्ण टाळेबंदी! नेमकी कधीपासून? काय राहणार सुरू, काय बंद? वाचा एका क्लिकवर

ठाण्यातही संपूर्ण टाळेबंदी! नेमकी कधीपासून? काय राहणार सुरू, काय बंद? वाचा एका क्लिकवर

संपूर्ण ठाणे शहर बंद राहणार की हॉटस्पॉटपुरती टाळेबंदी आणि काय बंद काय सुरू याची संपूर्ण यादी वाचा सविस्तर

  • Share this:

ठाणे, 30 जून : ठाणे शहरात Coronavirus च्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. Unlock च्या पहिल्या टप्प्यातच रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली, हे लक्षात घेऊन महापालिकेने 10 दिवस संपूर्ण टाळेबंदी (Complete Lockdown)करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवार 2 जुलै सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जुलै सकाळी 7 पर्यंत संपूर्ण ठाणे शहरात टाळेबंदी लागू होईल. फक्त अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांनाच रस्त्यावर उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या काळात सामान्य नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेर पडावं, असं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे.

या 10 दिवसात संपूर्ण ठाणे शहरात लॉकडाऊन असेल, पण हॉटस्पॉट असलेल्या 22 भागांमध्ये कडक अंमलबजावणी होईल, असं पालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे. महापालिकेने मंगळवारी यासंदर्भात आदेश काढला आहे.

सुरुवातीला ठाण्यात फक्त रुग्णसंख्या वाढत असलेल्या हॉटस्पॉटमध्येच टाळेबंदी कडक करण्याची योजना होती. पण नवे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संपूर्ण शहर बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं. वेगवेगळी दुकानं, आस्थापना, संस्था सुरू ठेवल्या तर ठराविक भागात नागरिकांची वर्दळ आटोक्यात ठेवता येणार नाही. त्यामुळे आता संपूर्ण शहरात टाळेबंदी असेल.

या शहरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर; फक्त दूध आणि औषधंच मिळणार

ठाणे शहरात कालच्या आकडेवारीनुसार 9644 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 315 नागरिकांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.

यावर बंदी

दुकानं (जीवनावश्यक सेवा देणारी वगळून)

रिक्षा, बस, टॅक्सी (अत्यावश्यक सेवेतल्या वगळून)

खासगी वाहनांना फक्त जीवनावश्यक सेवेसाठी परवानगी

5 पेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी जमण्यास बंदी

खासगी प्रवासी वाहतूक

खासगी वाहनात ड्रायव्हरसह फक्त 2 लोकांना अनुमती

खासगी ऑफिस

व्यावसायिक आस्थापने

कारखाने, दुकानं (अत्यावश्यक सेवा आणि त्यांचे पुरवठादार वगळून)

सरकारी कार्यालयांत कमीत कमी उपस्थितीत कामाला परवानगी

अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडणे

हे राहील सुरू

रुग्णालयं, औषध विक्री

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं

पेट्रोल पंप (फक्त अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांसाठी)

बँक, एटीएम इत्यादी

भाजी आणि किराणा वाहतूक करणाऱ्या गाड्या

मद्यविक्री (फक्त होम डिलिव्हरीची परवानगी)

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमं

घरपोच अन्नधान, भाजी इत्यादी पुरवणाऱ्या सेवा

ठाण्याप्रमाणेच मीरा भाईंदर महापालिकेतही 10 दिवस कडक लॉकडाऊन असेल.

VIDEO : मास्क लावायला सांगितलं म्हणून दिव्यांग महिलेला केली मारहाण

मुंबई महानगर क्षेत्रात (MMR)कोरोनाचे(Coronavirus)रुग्ण वाढत आहेत. मुंबई महापालिकेने धारावीसारख्या झोपडपट्टी भागात रुग्णवाढ नियंत्रित केलेली असली, तरी मुंबईबाहेरच्या उपनगरांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात टाळेबंदीचे नियम कडक करणार अशी घोषणा झाली. पण प्रत्यक्षात मीरा भाईंदरपासून या कडक टाळेबंदीला सुरुवात होणार आहे.

मीरा भाईंदरमध्ये तर भाजी मार्केटही बंद राहतील. फक्त औषध आणि दुधाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. 1 ते 10 जुलैदरम्यान हा लॉकडाऊन असेल.

संकलन - अरुंधती

First published: June 30, 2020, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading