मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुप्रिया सुळेंशी पंगा घेणे शिंदे गटाच्या नेत्याला पडले भारी, आता केला घुमजाव, पण तक्रार दाखल

सुप्रिया सुळेंशी पंगा घेणे शिंदे गटाच्या नेत्याला पडले भारी, आता केला घुमजाव, पण तक्रार दाखल

शितल म्हात्रे यांनी ट्वीट केलेला फोटो मार्फ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

शितल म्हात्रे यांनी ट्वीट केलेला फोटो मार्फ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

शितल म्हात्रे यांनी ट्वीट केलेला फोटो मार्फ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 24 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो समोर आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल करणे शिंदे गटाच्या समर्थक शीतल म्हात्रे यांना चांगलेच भोवले आहे. शितल म्हात्रे यांनी ट्वीट केलेला फोटो मार्फ केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

शिंदे गटाच्या समर्थक शितल म्हात्रे यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेल्या असल्याचा फोटो ट्वीट केला होता. या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्या आहेत असं दिसतं आहे. त्यांच्या शेजारी त्यावेळी आरोग्य मंत्री असलेले राजेश टोपे आणि गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसत आहे.

शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करताच ऱाष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलं आहे आणि शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. त्यामुळे शितल म्हात्रेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

(राष्ट्रवादी खरंच सोडणार का? अमित शहांच्या भेटीबद्दल खडसेंचं स्पष्टीकरण)

तर दुसरीकडे, सुप्रिया सुळेंचा फोटो ट्विट केल्याच्या मुद्द्यावर शीतल म्हात्रेंनी घुमजाव केलंय. हा फोटो खरा असल्याचा दावा आपण कुठेही केला नव्हता याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ, अशी सारवासारव म्हात्रेंनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांचा फोटो एडिट केल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांचा फोटो देखील एडिट केला असल्याचा दावा शितल म्हात्रे यांनी केला असून राष्ट्रवादीकडून पोलिसात दिलेल्या तक्रारी विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असं शितल म्हात्रे म्हणाल्या.

(एकनाथ खडसेंची होणार घरवापसी? देवेंद्र फडणवीसांची एका ओळीत प्रतिक्रिया)

तर, दुसऱ्या कोणाच्याही खुर्चीवर बसण्याची परंपरा पवार घराण्याची किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही. दुसऱ्याची खुर्ची खेचून त्याच्यावर बसण्याची संस्कृती कोणाची आहे हे सबंध महाराष्ट्राला माहित आहे, असा टोला राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासेंनी लगावला.

First published: