मुंबई, 28 जून: आपली आषाढी वारीची परंपरा आहे. आषाढी वारी आली आहे आणि मी पंढरपुरला चाललो आहे. विठूरायाला कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडं घालणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा, वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा..30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
आपल्या विठू रायाला साकडं घालणार आहे, राज्यात काय परिस्थिती निर्माण झाले आहे. लाखो वारकरी आज घरात अडकले आहे. अनेक चित्रपटातून तुझे चमत्कार आम्ही पाहिले आहे. राज्यावरील कोरोना संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी पाठीशी उभे राहावे. मुख्यमंत्री म्हणून मान वेगळा आहे पण मी मुख्यमंत्री म्हणून नाहीतर तुमचा प्रतिनिधी म्हणून जात आहे.
राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वधर्मियांना आपले उत्सव घरातच साजरे करावे लागले. त्यांना मोठा संयम दाखवला. यासाठी त्यांचे आभार मानतो. आषाढी एकादशीची वारीही संकटात आली. वारकऱ्यांनी संयम दाखवला, यासाठी त्यांचेही आभार, मात्र मी विठूरायाला साकडे घालायला जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या घोषणेमुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे. आषाढी एकादशीला उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक पंढरपूरला जाऊ नये, विठ्ठलाची महापूजा करू नये, असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा... अमित शाहांच काँग्रेसवर हल्लाबोल; 'तो हो जाए दो-दो हाथ', म्हणत दिलं मोठं आव्हान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी (28 जून) दुपारी दीड वाजेच्या सुमारास राज्यातील जनतेशी संवाद साधला. आधी कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र शासनाने चांगले काम केले, मनुष्यहानी कमी करण्याचे प्रयत्न केले. तसेच राज्यातील अनलॉकबाबत आणि इतर गोष्टींवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाष्य केलं. सध्या राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. राज्यभरातील सलून दुकानंही सुरु करण्याची सूट देण्यात आल्याची माहिती दिली.