नागपूर, 02 ऑगस्ट: महाराष्ट्राच्या (Maharashtra) उपराजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. नागपुरात (Nagpur) केवळ साडे तीन तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका 16 वर्षांच्या मुलीवर (16-year-old girl) गँगरेप (Gang Raped) झाला आहे. धक्कादायक म्हणजेच या गँगरेपमध्ये जवळपास सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याचं समजतंय. गुरुवारी घरच्यासोबत क्षुल्लक वाद झाल्यानं पीडित मुलगी घर सोडून गेली. त्यानंतर ही घटना घडली आहे. या गँगरेप प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. या घटनेनं उपराजधानी चांगलीच हादरली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा तिच्या कुटुंबियांशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. ज्यानंतर ती घर सोडून गेली. त्यानंतर तिनं सिव्हिल लाईन्सला जाण्यासाठी रिक्षा पकडली. पण चालकाला समजलं की, तिच्याकडे पैसे नाहीत. पैसे नसल्यानं त्यानं तिला रिक्षातून खाली उतरण्यास सांगितलं. त्याच दरम्यान पीडितीनं मदतीसाठी मोहम्मद तौसीफ (26) आणि मोहम्मद शाहनवाज उर्फ सना (25) या दोन रिक्षाचालकांशी संपर्क साधला. मात्र या दोन्ही नराधमांनी रात्रीचा अंधाराचा फायदा घेत तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेलं. त्या ठिकाणी तिच्यावर चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्या नंतर तिला रिक्षानं मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिज जवळ सोडलं. आरोपी तौसिफ आणि सना यांनी मुलीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाजवळ (IGGMCH) रिक्षाचालक मोहम्मद मुशीर (23) आणि आणखी एका व्यक्तीच्या स्वाधीन केले. तिथे मोहम्मद मुशीर आणि इतर व्यक्तीनं मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार केला आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेले. द टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ, पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा त्यानंतर इतर दोन रिक्षाचालकांनी त्या मुलीला पाहिलं आणि तिला काय झाल्याचं विचारलं. त्यावर पीडित मुलीनं त्या रिक्षाचालकांना आपल्याला नाशिकला जायचं असल्याचं सांगितलं. या दोन्ही चालकांनी तिला नाशिकला जाण्याचं रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी मदत केली आणि तिला काही रोख रक्कम दिली. त्याच दरम्यान रेल्वे पोलिसांच्या पथकाला ही पीडित मुलगी नागपूर रेल्वे स्थानकावर दिसली. त्यावर पोलिसांना संशय आल्यानं जीआरपी कर्मचारी मुलीजवळ गेले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला एका NGOच्या ताब्यात दिले. पीडितीला आश्रयगृहात हलवण्यात आले, जिथे तिने तिच्यावर गँगरेप झाल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सना, तौसीफ, मुशीर आणि मोहम्मद नौशाद यांना संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.