मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मी फोटोसेशनासाठी नाही, मदतीसाठी आलोय'; मुख्यमंत्र्यांनी घेतला रत्नागिरीतील नुकसानाचा आढावा

'मी फोटोसेशनासाठी नाही, मदतीसाठी आलोय'; मुख्यमंत्र्यांनी घेतला रत्नागिरीतील नुकसानाचा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी मुंबईहून रत्नागिरी (CM Uddhav Thackeray in Ratnagiri) येथे पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी करत जिल्हा प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला आहे.

पुढे वाचा ...

रत्नागिरी 21 मे : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळाचा या जिल्ह्यांना चांगलाच फटका बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी मुंबईहून रत्नागिरी (CM Uddhav Thackeray in Ratnagiri) येथे पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी करत जिल्हा प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला आहे. यानंतर त्यांनी वादळामुळे नुकसान (Tauktae Cyclone affected district) झालेल्या शेती आणि फळबागांचं पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे सांगितले आहे.

या दौऱ्यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे. मी इथे केवळ फोटोसेशनसाठी आलो नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार आहे. यानंतर मुख्यमंत्री रत्नागिरीतून सिंधुदुर्गकडे रवाना झाले.

मागील वर्षी सुद्धा निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर ठीक वर्षभरानंतरच पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर आहेत.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचाही तीन दिवस चक्रीवादळाचा फटका बसलेल्या तीन जिल्ह्यात दौरा सुरू झाला आहे. तर राज्य सरकारच्यावतीने देखील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार दिनांक 20 ते 23 मे चार दिवस कोकण दौऱ्यावर आहेत.

First published:

Tags: Cyclone, Ratnagiri, Uddhav Thackeray (Politician)