हिम्मत असेल तर फिल्मसिटी युपीत नेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं योगींना ओपन चॅलेंज!

हिम्मत असेल तर फिल्मसिटी युपीत नेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं योगींना ओपन चॅलेंज!

उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यानाथ यांच्यावर सोडला टीकेचा बाण

  • Share this:

मुंबई, 6 नोव्हेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांना खुलं आव्हान (open challenge) दिलं आहे. हिम्मत असेल तर मुंबईतील फिल्मसिटी (mumbai film city) उत्तर प्रदेशात नेऊन दाखवावी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात बनवणार असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यानाथ यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. मुंबईतील फिल्मसिटी हलवण्याच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप आमने-सामने आली आहे.

हेही वाचा...गृहमंत्र्यांनी बाकीची स्टंटबाजी बंद करावी अन्..., भाजप नेत्यानं केली जहरी टीका

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चासत्राचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुंबई फिल्मसिटीमध्ये आधुनिक सुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, बॉलीवूड इंडस्ट्रीला सध्या अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या समस्या सोडवण्याचा सरकर प्रयत्न करत आहे. दादासाहेब फाळके यांनी ज्या भूमीत चित्रपटसृष्टीचा मुहूर्तमेढ रोवली, त्याठिकाणी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असं आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं.

काश्मीरमध्येही सुरु करा फिल्मसिटी, भाजपला टोला

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्रातून योगी सरकारच्या फिल्मसिटी उभारण्याच्या घोषणेवर भाजपवर खोचक टीका करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे चित्रिकरण आणि चित्रपटांचे प्रदर्शन बंद असताना योगीजींनी नव्या फिल्मसिटीची संकल्पना मांडली.

हेही वाचा...नाट्यमय घडामोडी! राष्ट्रवादीची ऐनवेळी माघार, भाजपच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ

आंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु होईल. पुढच्या दोन-अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. मात्र, मुंबईच्या चित्रनगरीचे महत्त्व कमी होऊ देणार नाही, असं शिवसेनेनं म्हटलं होतं.

Published by: Sandip Parolekar
First published: November 6, 2020, 2:53 PM IST

ताज्या बातम्या