मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे गेले', सुप्रिया सुळे म्हणाल्या...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे गेले', सुप्रिया सुळे म्हणाल्या...

 'दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधात देशातच नव्हे तर राज्यात खूप मोठं काम केलं आहे, त्यांनी आयुष्यपणाला लावले.

'दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधात देशातच नव्हे तर राज्यात खूप मोठं काम केलं आहे, त्यांनी आयुष्यपणाला लावले.

'दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधात देशातच नव्हे तर राज्यात खूप मोठं काम केलं आहे, त्यांनी आयुष्यपणाला लावले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Baramati, India

बारामती, 24 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर असताना ज्योतिष पाहायला गेले होते. त्यामुळे वाद पेटला आहे. 'महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांनी श्रद्धा ही ठेवलीच पाहिजेत पण अंधश्रद्धेबद्दल महाराष्ट्रात वेगळं मत आहे' असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डीच्या दौऱ्यावर होते, त्या दरम्यान ज्योतिष पाहायला गेले असल्याची माहिती समोर आली. याबाबत अंनिसने आक्षेप घेतला आहे. याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

'दाभोळकरांनी अंधश्रद्धेच्या विरोधात देशातच नव्हे तर राज्यात खूप मोठं काम केलं आहे, त्यांनी आयुष्यपणाला लावले. महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या लोकांनी श्रद्धा ही ठेवलीच पाहिजेत पण अंधश्रद्धेबद्दल महाराष्ट्रात वेगळं मत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

(शिंदे सरकार देणार वीजेचा झटका, महिन्याचे वीज बिल 200 रुपयांनी महागणार)

तसंच, नवीन पिढी काहीतरी देशासाठी करू पाहत असेल तर त्याचे आपण स्वागतच केले पाहिजे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावर सुळे यांनी कौतुक केलं.

कोणीच राज्याचा आणि देशाचा इतिहास चुकीचा लिहू नये. एका माणसाबद्दल कशाला बोलायचेय. इतिहास हा खराच असला पाहिजे. तो सोयीचा असता कामा नये, असं म्हणत सुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.

('राज्यपालांना तातडीने पदावरुन दूर करा'; उदयनराजेंची थेट पंतप्रधानांकडे मागणी)

'कोल्हापूर आणि सातारा गादी चे मनःपूर्वक आभार आहे. त्यांनी राज्याच्या इतिहासासाठी आणि छत्रपती हे आपले ध्यास आहे श्वास आहे दैवत आहे त्यांनी या आमच्या लढायला पुढाकार घेतलाय त्यांचे स्वागत आहे' असं म्हणत सुळे यांनी उदयनराजे आणि संभाजीराजे यांचं अभिनंदन केलं.

First published:

Tags: Marathi news