चिपळूण, 17 डिसेंबर : काल (दि.16) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी रत्नागिरी आगारातून 170 एसटी बसेसचं बुकिंग करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यासाठी चिपळूण गावातील 20 एसटी बसेस रत्नागिरीत दिल्यामुळे यांचा परिणाम तब्बल चिपळूण प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. याची रत्नागिरीच्या चिपळून आगारात जोरदार चर्चा रंगली होती.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे चिपळूण आगारातील 56 फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे गैरसोय झाली आहे. श्रीमान हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले होते. त्यासाठी रत्नागिरी आगरातील तब्बल 170 बस गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. यामधील चिपळूण आगारमधील 20 बस गाड्यांचा ही समावेश होता.
हे ही वाचा : फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा!
आगारातील 20 गाड्या गेल्याने चिपळूण आगारातील तब्बल 56 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय अपुऱ्या गाड्यांमुळे एसटीची वेळापत्रक कोलमडल्याने सर्व गाड्या उशिराने धावत होत्या.
मुख्यमंत्र्यांचा दिवसभर भरगच्च कार्यक्रम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. दिवसभर त्यांचा भरगच्च असा कार्यक्रम होता. आपल्या दौऱ्याची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रत्नागिरीतील एकदिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्री विविध पदाधिकारी, संघटनेसोबत चर्चा करणार होते.
हे ही वाचा : सोमय्या, दरेकरांनंतर आता प्रसाद लाड यांना मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणाचा तपास बंद
जिल्ह्यातील कोट्यवधी कोटींच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तर संध्याकाळी प्रमोद महाजन संकुलमध्ये सभा झाली. त्यानंतर रात्री ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.