मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेचा निकाल निर्णायक टप्प्यावर! शिंदे निवडणूक आयोगासमोर करणार आमदारांची ओळख परेड!

शिवसेनेचा निकाल निर्णायक टप्प्यावर! शिंदे निवडणूक आयोगासमोर करणार आमदारांची ओळख परेड!

फाईल फोटो

फाईल फोटो

शिवसेना कोणाची हा निर्णय आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : शिवसेना कोणाची हा निर्णय आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येणार आहेत. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात वाद सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर जाऊन एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेले आमदार दाखवणार आहेत. हे आमदार दाखवून एकनाथ शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क असल्याचं सांगणार आहेत.

हे सगळे आमदार आम्ही स्वमर्जीने एकनाथ शिंदेंसोबत आहोत, अशाप्रकारचं शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर करू शकतात. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे असतील तर ते याबाबत प्रश्न विचारू शकतात. याआधी एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र निवडणूक आयोगाला दिलं आहे.

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, यानंतर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने यासाठी घटनापीठाचीही स्थापना केली आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांची ओळख परेड करण्याची रणनिती आखली आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Election commission, Shivsena, Uddhav Thackeray